Step by step from the canteen to the library | तरुणाईची पावले कॉन्टीनमधून ग्रंथालयाकडे

तरुणाईची पावले कॉन्टीनमधून ग्रंथालयाकडे

ठळक मुद्देमहाविद्यालयीन परीक्षेपेक्षा आता स्पर्धा परीक्षेला जास्त महत्त्व फेब्रुवारी महिना संपत आल्यानंतर सर्वांना परीक्षा तोंडावर आल्याचे कळतनोट्स, अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ सुरू

रूपेश हेळवे 
सोलापूर : नवीन वर्ष सुरू झाले आणि बघता बघता फेब्रुवारी महिनाही संपत आला़ एका महिन्यावर परीक्षा येऊन ठेपल्यामुळे आता कॉन्टीनमध्ये एंजॉय करणाºया तरुणाईची पावले आता हळूहळू ग्रंथालयाकडे वळू लागली आहेत़ याचबरोबर कोर्सचे प्रोजेक्ट, फाईल्स, जनरल, डेझरटेशन पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून महाविद्यालयातील गं्रथालयामध्ये अनेक रिकामे बेंच दिसत होते़ आता सकाळी लवकर येऊन ग्रंथालयात बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे़ याचबरोबर अधून-मधून कॉलेजला दांड्या मारणारे विद्यार्थी मात्र अजूनही इतर मित्रांचे नोट्स मिळतील का किंवा त्याच्या झेरॉक्स मिळतील का, या विचारात पडले आहेत़ यातीलच काही विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले.

फेब्रुवारी महिना संपत आल्यानंतर सर्वांना परीक्षा तोंडावर आल्याचे कळत आहे़ यामुळे राहिलेल्या नोट्स, अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे़ याचबरोबर परीक्षा फॉर्म भरणे, ट्रीपला जाणे यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत़ 
- पद्मश्री कुलकर्णी, 
विद्यार्थिनी 

परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाचा ताण वाढत आहे़ यामुळे अभ्यासाचे मॅनेजमेंट कोलमडत आहे़ याचबरोबर प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी वेळ खूप कमी पडत आहे़ याचबरोबर ट्रीप जात आहे़ यामुळे त्यातही आणखी वेळ कमी मिळणाऱ
- स्मिता गदगे

परीक्षा जवळ आल्यानंतरच आमचा अभ्यास होतो़ यामुळे आता आम्हाला अभ्यासाची ओढ लागत आहे़ याचबरोबर थोडे तणावही वाढत आहे़ यामुळे दररोज थोडा-थोडा अभ्यासही सुरू आहे़ 
- श्रीनिवास हिबारे

आता फक्त परीक्षेचेच टेन्शन आले आहे़ परीक्षेच्या टेन्शनमध्ये अभ्यासाकडेही लक्ष लागत नाही़ याच सोबत प्रोजेक्टही पूर्ण करण्यासाठी अर्धी रात्र जागून काढावी लागत आहे आणि दिवसभर ग्रंथालयात वेळ घालावे लागत आहे़ 
- पौर्णिमा शिंदे

आता पदवी परीक्षा तर पास झालो़ पण पदवीपेक्षा आता नोकरीच्या शोधासाठी पुढील शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे लक्ष आहे़ याचबरोबर आता कॉलेजचे प्रोजेक्ट करण्यासाठीही ओढाताण होत आहे़ पण नियोजनामुळे जास्त त्रास होत नाही़ 
- वैभव आठवले

परीक्षा हे शब्द जरी कानावर पडले की, आमची धावपळ होत आहे़ यामुळे अभ्यासासाठी दिवस-रात्र एक करत आहोत़ सध्या आमची हालत म्हणजे सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन तासात दाखवल्या जाणाºया चित्रपटासारखी झाली आहे़ वेळ कमी पडत असल्यामुळे ग्रंथालयात जास्त वेळ घालवत आहोत़ 
- नागेश पवार 

महाविद्यालयीन परीक्षेपेक्षा आता स्पर्धा परीक्षेला जास्त महत्त्व मी देत आहे़ यामुळे टक्केवारीपेक्षा नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे़ यामुळे ग्रंथालयामध्ये पूर्ण वेळ घालवत आहोत़ 
- जयप्रकाश सर्दनकर 

Web Title: Step by step from the canteen to the library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.