२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By दिपक दुपारगुडे | Updated: January 19, 2024 14:16 IST2024-01-19T14:16:00+5:302024-01-19T14:16:00+5:30

महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Start mobile flash on January 22: PM Narendra Modi | २२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

२२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. याच दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. मोदी म्हणाले, आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. 

महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच यावेळी असेल त्या ठिकाणाहून संध्याकाळी मोबाइलचा फ्लॅश सुरु करुन संकल्प करण्यासही त्यांनी सांगितलं. तसेच मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं असल्याचे सांगितलं.

Web Title: Start mobile flash on January 22: PM Narendra Modi