भांडेगांव येथे एस.टी. बसची धडक, चार वर्षाची मुलगी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:55 IST2018-10-05T16:54:30+5:302018-10-05T16:55:31+5:30

भांडेगांव येथे एस.टी. बसची धडक, चार वर्षाची मुलगी जागीच ठार
वैराग : भांडेगांव ( ता. बार्शी ) येथे एस.टी. बस पाठीमागे (रिव्हर्स ) घेत असताना जोराची धडक बसुन चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली़ याप्रकरणी वैराग पोलीसात एस. टी. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भाडेगांव येथे येथे शुक्रवार ५ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याचे दरम्यान घडली.
मयत मुलीचे नांव प्रणिता प्रल्हाद आवटे (वय वर्षे ४) ( रा. भांडेगांव ता. बार्शी ) असे आहे. या घटनेची वैराग पोलीसानी दिलेली माहीती अशी की, परिवाहन महामंडळाच्या बार्शी आगाराची एस. टी. बस एम.एच - १४- बी.टी. २४०९ ही भांडेगांव येथे मुक्कामी होती. सदर बस शुक्रवारी सकाळी चालकाने चालू करून पाठीमागे ( रिव्हर्स ) घेत होता. त्यावेळी एस. टी. बसच्या पाठीमागे रस्त्यालगत खेळत असलेल्या मयत प्रणितास बसची जोराची धडक बसली व ती कच्च्या रस्त्यावर जोराने आपटली़ तिच्या डोक्याला जबर मार लागून ती जागीच मयत झाली. अशी फिर्याद मयत मुलीचे वडिल प्रल्हाद चांगदेव आवटे (रा़. भांडेगांव) यांनी वैराग पोलीसात दिली आहे.
एस टी बस चालक सुनिल निलकंठ भोसले (रा. राळेरास ता. बार्शी ) यांच्या विरोधात वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. बस चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. अनिल गोडसे हे करीत आहेत.