शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:31 PM

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत  सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

ठळक मुद्दे महाराष्ट्र मुलांच्या संघाची ४१ वर्षात प्रथमच विजेतेपदाला गवसणी१७ गुणासह पंजाब राज्याने द्वितीय तर १४ गुणासह मणिपूर राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.सोलापुरात झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक तिसरा क्रमांक मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ :  केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत  सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये महाराष्ट्र संघाने तब्बल ४१ वर्षात प्रथमच वरिष्ठ गट स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.        मंगळवारी दुपारी झालेल्या मुलांच्या सांघिक सायबर प्रकारातील अंतिम सामन्यात एसएससीबी संघाने जम्मू काश्मीर संघावर ४५-३० गुणाने मात करत  विजय संपादन केला.विजेत्या संघाकडून आय सुरेंद्रो, जीशो निधी,प्रवीण आणि कुशाल यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जम्मू काश्मीर संघाच्या विशाल थापर,जावेद अहमद चौधरी, प्रदीप कुमार आणि वंश महाजन यांचा प्रतिकार परतवून लावला आणि मोठ्या फरकाने सामना जिंकला.        मुलांमध्ये ३० गुणासह एसएससीबी संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.त्यानंतर १५ गुणासह राजस्थान द्वितीय आणि ८ गुणासह महाराष्ट्र राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.भारतात १९७४ साली तलवारबाजी खेळाला सुरुवात झाली.तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल ४१ वर्षात महाराष्ट्राला वरिष्ठ गटाचे विजेतेपद मिळाले नव्हते.सोलापुरात झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक तिसरा क्रमांक मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले असल्याचे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार अशोक दुधारे यांनी सांगितले.        केगावच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधीक्षक कविता नेरकर - पवार आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी तसेच मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.सिंहगड कॅम्पस परिसरातील उत्कृष्ट वर्तणुकीबद्धल एसएससीबी मुले आणि छत्तीसगड राज्याला भारतीय तलवारबाजी महासंघाचे खजिनदार अशोक दुधारे, सरचिटणीस बशीर खान , संजय नवले तसेच प्राचार्य डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मुलींमध्ये ३० गुणासह केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १७ गुणासह पंजाब राज्याने द्वितीय तर १४ गुणासह मणिपूर राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.       यावेळी महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ.उदय डोंगरे,सिंहगडचे उपप्राचार्य प्रकाश नवले,राजेंद्र माने,सुहास छंचुरे,प्रा.रविंद्र देशमुख, प्रा.करीम मुजावर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSportsक्रीडा