बेकायदा सावकरी करणारा सोलापूरचा श्रीनिवास संगा स्थानबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:06 IST2018-10-31T19:05:27+5:302018-10-31T19:06:14+5:30
सोलापूर : बेकायदा सावकारीबरोबरच खंडणी, चोºया, दहशत माजवणाºया गंभीर गुन्ह्याची दखल घेत सराईत गुन्हेगार श्रीनिवास संगा याच्यावर पोलीस आयुक्तालयाकडून ...

बेकायदा सावकरी करणारा सोलापूरचा श्रीनिवास संगा स्थानबध्द
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयाकडून स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध दुसºयांदा ही कारवाई केली
सोलापूर: बेकायदा सावकारीबरोबरच खंडणी, चोºया, दहशत माजवणाºया गंभीर गुन्ह्याची दखल घेत सराईत गुन्हेगार श्रीनिवास संगा याच्यावर पोलीस आयुक्तालयाकडून स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध दुसºयांदा ही कारवाई केली आहे.
शहरातील जेलरोड, जोडभावी, एमआयडीसी आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यात संगा याच्याविरुद्ध दहशत माजवून खंडणी वसूल करणे, आत्महत्येस भाग पाडणे, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, बेकायदा सावकारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सन २००८ पासून ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.