नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी
By Appasaheb.patil | Updated: June 24, 2023 18:44 IST2023-06-24T18:42:18+5:302023-06-24T18:44:46+5:30
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले.

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी
सोलापूर : अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले.
रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले.
अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.
अमेरिकन राजदूताची उपस्थिती -
सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थितीत होते.