दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 25, 2023 22:34 IST2023-02-25T22:33:29+5:302023-02-25T22:34:14+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई व विभागीय स्पोर्ट्स असोसिएशन, सोलापूरच्या वतीने आयोजित सतराव्या खो- खो स्पर्धेचे अजिंक्यपद दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकाविले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली आहे.
मध्य रेल्वे मुंबईचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक अलोक सिंग यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक प्रदान करण्यात आला आहे. या वेळी मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव दिव्य ज्योतीसेना गुप्ता, मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे डीआरएम नीरजकुमार दोहरे, एडीआरएम शैलेंद्रसिंग परिहार, सोलापूर विभागाचे क्रीडा अधिकारी विवेक होके, मध्य रेल्वे मुंबईचे क्रीडा अधिकारी अशोक शांडिल्य, रंजीत माहेश्वरी आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"