दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांना मारहाण; रेल्वेखाली टाकून जिवे मारण्याची दिली धमकी

By Appasaheb.patil | Updated: January 3, 2023 13:40 IST2023-01-03T13:39:57+5:302023-01-03T13:40:41+5:30

आलेगावातील घटना 

son beats father for not paying for drinking incident in alegaon solapur | दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांना मारहाण; रेल्वेखाली टाकून जिवे मारण्याची दिली धमकी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांना मारहाण; रेल्वेखाली टाकून जिवे मारण्याची दिली धमकी

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : दारू पिण्यासाठी पैसे द्या नाहीतर तुम्हाला रेल्वेखाली टाकून मारतो अशी धमकी देत मुलाने वडिलांना टॉमीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आलेगांव (ता.द.सोलापूर) येथील सिमेंट फॅक्टरीत घडली.

तुळशीराम बळी चोरमुले (वय ६५, रा. आलेगांव, ता.द.सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा मल्हारी तुळशीराम चोरमुले (वय ३४) याच्याविरोधात वळसंग पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पत्नीसोबत बसले असता मुलगा मल्हारी हा तेथे आला. 

दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही असे म्हणून हातातील टॉमीने व लाथाबुक्क्याने मारहाण करून खिशातील दोन हजार रूपये हिसका मारून घेतले. याचवेळी माझ्या नादाला लागाल तर तुम्हाला रेल्वेखाली टाकून मारतो तसेच मोबाईल परत देणार नाही, तुमची गाडी पेटवून टाकतो अशी दमदाटी करून निघून गेला. यावेळी उपस्थितांनी वडिल व मुलांमधील भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र शिवीगाळ करीत असल्याने नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. मुलाच्या आईनेही भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र तिलाही यश आले नाही. याप्रकरणाची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निंबाळे हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: son beats father for not paying for drinking incident in alegaon solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.