वडिलांना चापट का मारली म्हणून विचारलं; त्यानं उलट रॉडनं मारुन जखमी केलं

By विलास जळकोटकर | Updated: May 3, 2023 19:18 IST2023-05-03T19:18:01+5:302023-05-03T19:18:25+5:30

ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास साखर पेठेत घडली. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

son asked why slapped father, He instead hit and injured him with a rod | वडिलांना चापट का मारली म्हणून विचारलं; त्यानं उलट रॉडनं मारुन जखमी केलं

वडिलांना चापट का मारली म्हणून विचारलं; त्यानं उलट रॉडनं मारुन जखमी केलं

सोलापूर : लहान मुलांच्या भांडणानंतर, बोलण्याच्या बहाण्याने वडिलांना घराबाहेर बोलावून चापट मारली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या मुलालाही राॅडने मारहाण करून जखमी केले. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास साखर पेठेत घडली. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमीन समीद दामरगिदे ( वय 25, रा.साखर पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अजहर नलामंदु, ताजोदीन नलामंदु व अल्ताफ नलामंदु( सर्व रा. साखर पेठ) विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. दामरगिदे व नलामंदु हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. सोमवार त्यांच्या घरातील लहान मुलांमध्ये तक्रार झाली. या तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये शाब्दिक वाद झाला.

यानंतर रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी आणि त्यांचे वडील घरी आले. तेव्हा शेजारी राहणारे नल्लामंदू यांनी वडिलांना बोलण्याचा बहाणा करुन घराबाहेर बोलावले. तेथे त्यांना चापट मारली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी नलामंदू यांच्याकडे गेले. त्यावेळी ताजुद्दीन व अल्ताफ यांनी फिर्यादीचे पकडून धरले व अजहर याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून फिर्यादीस जखमी केले. पोलीस हवालदार पटेल तपास करीत आहेत.
 

Web Title: son asked why slapped father, He instead hit and injured him with a rod