शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

गुंडांना शोधण्यासाठी सोलापूरात कोम्बिंग आॅपरेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:15 PM

पोलीस आयुक्त : शांतता-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा फिक्स पॉर्इंट

ठळक मुद्देरेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासणार गजबजलेल्या नवीपेठेतील व्यापाºयांना दिलासा देण्याचे कामपोलीस खाते जनतेच्या रक्षणासाठी तत्पर आहे - पोलीस आयुक्त

सोलापूर : गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या सोलापूर शहरात शनिवारी रात्री मोबाईल गल्लीत झालेल्या सत्यवान उर्फ आबा कांबळे यांच्या खूनप्रकरणाने शहरभर एकच चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सन २००४ ते सद्यस्थितीपर्यंत पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासणार आहे. शिवाय शहरात दहशत पसरविणाºया गुंडांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.

शनिवारी मोबाईल गल्ली येथे सत्यवान उर्फ आबा कांबळे यांचा निर्घृण खून केल्यावरुन पोलिसांनी गामा पैलवान, रविराज शिंदे, अभिजित शिंदे, प्रशांत शिंदे, विनीत खाणोरे, तौसिफ विजापुरे, नीलेश महामुनी यांना पोलिसांनी २४ तासात अटक करुन लोकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी शांततेचे आवाहन करीत गजबजलेल्या नवीपेठेतील व्यापाºयांना दिलासा देण्याचे काम केले. घटनेनंतर दुसºया दिवशी काही जणांनी नवीपेठेत दहशत माजवून दुकाने बंद करण्यासाठी आरडाओरडा केल्याने व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी लागलीच या प्रकरणी प्रमोद बनसोडे, विशाल बनसोडे, आकाश गुरव, प्रशांत गुरव, सोनू कदमसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. 

आरसीपीची फौज तैनातनवी पेठ येथे चोख बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना निर्भय होण्याच्या दृष्टीने फिक्स पॉर्इंट नेमला आहे.  नवीवेस पोलीस चौकीसमोर या घटनेचे पडसाद निवळेपर्यंत  आरसीपीची फौज तैनात करण्यात आली अहे. व्यापाºयांमध्ये असणारी भीती घालवण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांना दिलासा देत चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन देत कोणीही न घाबरता आपापली दुकाने चालू ठेवण्याचे आवाहन करताना नवीपेठेत फिक्स पॉर्इंट नेमल्याचे स्पष्ट केले. शिवाय ३० जणांचे आरसीपी पथक कायमस्वरूपी तैनात केल्याचे सांगितले. व्यापाºयांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हावी, यासाठी २४ तास पेट्रोलिंगही चालू असून कोठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा प्रत्यक्ष मला संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले. 

तपासासाठी पोलीस १४ वर्षांचे रेकॉर्ड तपासणार- निर्घृणपणे खून झालेल्या सत्यवान उर्फ आबा कांबळे यांच्या खूनप्रकरणानंतर शहरभर एकच खळबळ उडालेली असताना ज्या गुन्ह्याखाली मयत आबा कांबळे याला शिक्षा झाली होती. त्या अनुषंगाने सन २००४ पासूनच्या गुन्हेगारांची पोलीस रेकॉर्डवरील तपासणी करुन या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. आजवर झालेल्या तपासात सात आरोपी निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

कठोर कारवाई करणार- शहराचे स्वास्थ्य अबाधित राहावे. नागरिकांमध्ये नाहक घबराट पसरवू नये आणि असे कोणी करताना आढळले तर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही दहशतीखाली वावरू नये. पोलीस खाते जनतेच्या रक्षणासाठी तत्पर आहे, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrimeगुन्हा