शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ४० गावात सोलर पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:46 AM

विजेची व बिलाची होणार बचत: १० तालुक्यातील गावांचा समावेश

ठळक मुद्देसोलर पंप बसविण्यास शासनाने मंजुरी दिलीपंप बसविल्यानंतर विजेची व बिलाची बचत होणार

सोलापूर: जिल्ह्यातील ४० गावांच्या पिण्याच्या स्रोतावर सोलर पंप बसविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, त्याचे काम सुरू झाले आहे. ५ हॉर्सपॉवरचे पंप बसविल्यानंतर विजेची व बिलाची बचत होणार  आहे.

सध्या विजेच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर होत आहे. वीज असेल तरच गावकºयांना पिण्याचे पाणी मिळते, वीज नसेल तर पाणीपुरवठा ठप्प होतो. याला पर्याय सोलर असून, प्रस्ताव आलेल्या जिल्ह्यातील ४० गावात सोलर पंप बसविले जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात चिंचोळी, मानेगाव, उपळाई बु., सापटणे बु., मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी, भाळवणी, लेंडवेचिंचाळे, सोड्डी, उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ, पडसाळी, हगलूर, पाकणी, बार्शी तालुक्यातील धानोरे, गोळवेवाडी, खामगाव, राळेरास, नारीवाडी, दक्षिणमधील औज मं., कारकल, मंद्रुप, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव, सिन्नूर, कलहिप्परगा, सांगोल्यातील कडलास, चोपडी, बलवडी, वाडेगाव,  करमाळा तालुक्यातील पांगरे, अंजनडोह, निमगाव, पाडळी, टाकळी, आवाटी, मोहोळ तालुक्यातील पापरी, बिटले, अनगर, खंडोबाचीवाडी, पंढरपूर तालुक्यातील करकंब, खर्डी, बाभुळगाव आदी गावात हे सौर पंप बसविले जाणार आहेत.

आमच्या गावात सध्या हापशावर एक एच.पी.चे चार सोलर पंप बसविले आहेत व सध्या ते चांगल्या प्रकारे सुरू आहेत. नागरिकांना वीज नसतानाही पाणी मिळत असल्याने पाण्याची अडचण दूर झाली आहे. नव्याने विहिरीतून पाणी उपसणारा सोलर पंप मंजूर झाला आहे.- अंकुश गुंड, सरपंच, अनगर मोहोळ

मंजूर झालेल्या गावात जाऊन सर्वेक्षण करून ग्रामपंचायतीकडून जागा निश्चितीचे फॉर्म भरून घेतले जात असून, प्रत्यक्षात मे अखेरला कामाला सुरुवात होईल. महिनाभरात पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला जाईल.- सौरभ कुंभार, व्यवस्थापक, सोयो सिस्टीम, जळगाव

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीmahavitaranमहावितरणgovernment schemeसरकारी योजना