शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतून मिळणार सोलापूर जिल्हा परिषदेला सौरऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 16:16 IST

प्रक्रिया सुरू: साडेतीन कोटी खर्च वाचला, प्रस्ताव सभेपुढे येणार

ठळक मुद्देसीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सुमारे साडेतीन कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार इमारतीवर सौरऊर्जा संयंत्र बसवून विजेची बचत करण्याचा हा प्रस्ताव हा प्रस्ताव मंजुरीसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची प्रशासनाने तयारी केली

सोलापूर : केंद्र सरकारने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीच्या इमारतीला सौरऊर्जा संयंत्र पुरविण्यात येणार आहे. यामुळे झेडपीने सेस फंडातून सौरउर्जेसाठी केलेले साडेतीन कोटी रुपये वाचणार आहेत. 

ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी मिनी मंत्रालय असलेली झेडपी अनेक योजना राबवित असते. गावे, वाड्या-वस्त्यांवरील लोकांना रात्री प्रकाश मिळण्यासाठी झेडपीने अनेक सौरदिवे वाटप केले आहेत.आता प्रत्यक्ष झेडपीला स्मार्ट सिटी योजनेचा लाभ मिळणार आहे.

 स्मार्ट सिटी योजनेत महापालिका हद्दीत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयावर सौरऊर्जा संयंत्र बसविण्याची योजना आहे. यानुसार सध्या महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, हुतात्मा स्मृती मंदिर, आयुक्त निवास, मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर विद्यापीठ, सायन्स सेंटर या ठिकाणी सौरऊर्जा संयंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायालय, सिव्हिल हॉस्पिटल, आकाशवाणी केंद्र, शासकीय विश्रामधाम या ठिकाणी सौरऊर्जा बसविण्याचा प्रस्ताव आहे. यातील फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा ना हरकत दाखला मिळाला आहे. इतर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न आल्याने काम थांबले आहे. 

महापालिकेप्रमाणेच झेडपी ही स्थानिक स्वराज संस्था आहे. त्यामुळे झेडपीला ही योजना राबविता येते काय याबाबत संभ्रम होता. त्यामुळे झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी महापालिकेचे आयुक्त तथा सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यावर डॉ. ढाकणे यांनी स्मार्ट सिटीतून झेडपीलाही सौरऊर्जा संयंत्र पुरविणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीला सौरऊर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा प्रस्ताव सभेपुढे ठेवून मंजुरी मिळाल्यावर स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात येईल अशी माहिती सीईओ डॉ. भारुड यांनी दिली. 

सीईओंचा साडेतीन कोटी खर्चाचा प्रस्ताव- झेडपीच्या इमारतीसाठी सौरऊर्जा बसविण्यासाठी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सुमारे साडेतीन कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता. झेडपीची मुख्य इमारत व शिक्षण, आरोग्य विभागाच्या इमारतीवर सौरऊर्जा संयंत्र बसवून विजेची बचत करण्याचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची प्रशासनाने तयारी केली असताना स्मार्ट सिटी योजनेने झेडपीला तारले आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून झेडपीला सौरऊर्जा संयंत्र मिळत असेल तर ही चांगली बाब आहे. अद्याप या प्रस्तावाबाबत माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही. पण प्रस्ताव आलाच त्याला मंजुरी देण्यास काहीच हरकत नाही. -संजय शिंदेअध्यक्ष, झेडपी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPower Shutdownभारनियमनmahavitaranमहावितरण