शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दिल्ली अन् बिहारच्या हॉटेल्समध्ये तडतडली सोलापुरी सिमला मिरची

By appasaheb.patil | Updated: August 28, 2020 15:04 IST

किसान रेल्वे; कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सुखावला; नारळाची रोपंही रवाना

ठळक मुद्देकिसान रेल्वेला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद पाहता ही रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णयसोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतात पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी किसान रेल्वेची मदत

सोलापूर : स्थानिक बाजारपेठेपेक्षा प्रति बॉक्सला १५ ते २० टक्के अधिक दर, वाहतूक खर्चात २० ते २५ टक्के भाडे कमी, कमी वेळेत जास्त मालाची वाहतूक, चोरी, मालाचे नुकसान होत नसल्याने किसान रेलला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सांगोला परिसरातील सिमला मिरचीला बिहार, दिल्ली, मुंबईमधील हॉटेल्स, मॉल व अन्य बाजारपेठेत मागणी जास्त आहे़ किसान रेलच्या माध्यमातून दोन फेºयात तब्बल २०६ टन सिमला मिरची, डाळिंबासह अन्य शेतमाल बिहारमधील बाजारपेठेत पोहोचला आहे़ दरम्यान, शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल जलद व कमी खर्चात अन्य राज्यांत पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे विभागात किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार पहिली किसान रेल २१ आॅगस्ट रोजी सांगोला रेल्वे स्थानकावरून धावली़ त्यानंतर दुसरी रेल्वे २५ आॅगस्ट रोजी धावली. दहा डबे असलेली रेल्वेगाडी सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूरमार्गे बिहार (मुजफ्फरपूर) रेल्वे स्थानकांवर पोहोचते़ मागील दोन फेºयांत दौंड, बेलापूर, कोपरगाव येथीलही शेतमाल बिहारकडे रवाना झाला आहे. 

आठवड्यातून दोन दिवस धावणार ट्रेनवाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने किसान रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे़ सांगोला-मनमाड-दौंड ही रेल्वेगाडी मुजफ्फरपूर स्थानकापर्यंत जाणार आहे. प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ऐवजी सांगोला येथून सकाळी ८ वाजता सुटणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६़३० वाजता मनमाडला पोहोचेल़ रात्री ८ वाजता मनमाडहून सुटेल आणि दुसºया दिवशी रात्री एकच्या सुमारास दौंडला पोहोचेल. दौंडनंतर अहमदनगर आणि बेलापूरला जाईल. त्यानंतर ती पुढे मुजफ्फरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे़

असे मिळतात शेतमालाचे पैसे...सांगोला परिसरातील शेतमालाची विक्री शेताच्या बांधावरच होते़ दलालामार्फत मालाच्या दर्जानुसार किंमत ठरते, त्यानुसार दलालाकडून रोख स्वरूपात शेतकºयांना जागेवरच पैसे दिले जातात. दलाल हा सगळा माल स्वत:च्या जबाबदारीवर शेतातून थेट दिल्ली, बिहार व अन्य राज्यांतील मार्केटमध्ये पोच करतो़ त्यामुळे शेतकºयांचा वाहतूक खर्च, मार्केटमधील विविध कराचे पैसे वाचले जातात़ रस्ते वाहतूक खर्चापेक्षा रेल्वेने प्रति टन १ ते २ हजार रुपये कमी भाडे, कमी वेळेत जास्त मालाची निर्यात, चोरी, अपघात, पाऊस व अन्य कारणांनी होणारे शेतमालाचे नुकसान होत नाही. वाहतुकीसाठी रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त यासह अन्य कारणांमुळे शेतमालाच्या रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीकडे अधिक आकर्षित होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़ 

किसान रेल्वेला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद पाहता ही रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़ सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतात पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी किसान रेल्वेची मदत घ्यावी़ रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक अगदी कमी दरात, जलद व सुरक्षित आहे़    - प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल अधिकारी, सोलापूर.

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेतीFarmerशेतकरीBiharबिहार