शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी दिवाळी ; सोलापुरी पणत्यांचा अमेरिकेत उजेड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 12:15 IST

सोलापूर : सोलापुरी चादर, कपडे, शेंगा चटणी, भाकर अशा अनेक वस्तुंनी  केवळ प्रांतांच्या सीमाच ओलांडल्या नव्हे तर सातासमुद्रापारही गेल्या ...

ठळक मुद्दे ज्यूट आणि टोपलीपासून बनविलेले आकाशदिवे प्लास्टिकच्या पणत्या, जेल पणत्या, रिफ्लेक्शन अशा विविध घरगुती पणत्याफराळाचे विविध पदार्थ आणि दिवाळी साहित्यांचे २५ स्टॉल

सोलापूर : सोलापुरी चादर, कपडे, शेंगा चटणी, भाकर अशा अनेक वस्तुंनी  केवळ प्रांतांच्या सीमाच ओलांडल्या नव्हे तर सातासमुद्रापारही गेल्या आहेत़ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती फराळ-वस्तू बनविणाºया महिलांच्या काही वस्तू परदेशात दाखल झाल्या आहेत़ सोलापूर महिला उद्योजक संघटनेने गृहिणींच्या कौशल्याला संधी मिळवून देताच त्यांनी तयार केलेल्या पणत्या आणि आकाशदिवे या वस्तू अमेरिके त दाखल झाल्या आहेत.  

या प्रदर्शनात स्टॉल लावणाºया काही सुग्रणी अमेरिकेतील आपल्या काही नातेवाईकांना मिठाई पाठवत होत्या़ काही वर्षांनंतर अमेरिकनवासीय सोलापूरकरांनी  मिठाईबरोबरच आकाशदिवे, पणत्याही मागविण्यास सुरूवात केली. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी तेथे दिवाळीची बाजारपेठ दरवर्षी भरते; पण त्या वस्तू तेथील भारतीय व्यापाºयांनी अमेरिकेतच तयार केलेल्या असतात. अस्सल भारतीय आणि सोलापुरी वस्तूं हजारो किलो मिटर्स दूर राहून उपयोगात आणता याव्यात, या उद्देशाने आमच्या वस्तूंची विशेषत: आकाश दिवे आणि पणत्यांची खरेदी केली जाते, असे सोलापूर महिला उद्योजक संघटनेच्या पृथा हलसगीकर यांनी सांगितले.

या संघटनेच्या वतीने सारस्वत मंगल कार्यालयात एक दिवसीय ‘दीपोत्सव’ प्रदर्शनात फराळाचे विविध पदार्थ आणि दिवाळी साहित्यांचे २५ स्टॉल लागले़ शहरातील विविध ठिकाणच्या महिलांनी फराळाचे विविध पदार्थ, फटाके, पूजेचे साहित्य, आकाशदिवे, पणत्या, सुगंधी तेल आणि उटण्याचे साहित्य वैगरे स्टॉलवर लावले़ फराळाशिवाय महिलांसाठी कानातील, गळ्यातील शृंगार साहित्यही या स्टॉलमध्ये पाहायला मिळताहेत. घरगुती महिलांना चालना देणाºया या उपक्रमासाठी मेघना करवंदे, प्रांजली लागू, भारती देशक, अश्लेषा निपुणगे, मानसी कुलकर्णी, संजय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले़ 

अस्सल अन् हँडमेड वस्तू च्या प्रदर्शनात स्टॉलवर लागलेल्या वस्तूंमध्ये अस्सल सोलापुरीपणा दिसून आला. ज्यूट आणि टोपलीपासून बनविलेले आकाशदिवे साºयांनाच खुणावताहेत. याबरोबरच प्लास्टिकच्या पणत्या, जेल पणत्या, रिफ्लेक्शन अशा विविध घरगुती पणत्या पाहायला मिळाल्या़ अंगावर ओरखडे ओडले जाऊ नये म्हणून उटण्याचे विशेष साबणही पाहायला मिळाले़

टॅग्स :SolapurसोलापूरDiwaliदिवाळी