शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

पंतप्रधान मोदींना आवडली सोलापूरची भेट, व्यवसायिकाने पाठवले 'चद्दर जॅकेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:46 IST

पंतप्रधानांकडून आभार : कापड व्यावसायिक किरण यज्जांना फोन

ठळक मुद्देमोदी यांनी यज्जा यांनी शिवलेले जॅकेट परिधान करून सोलापूरच्या सभेत भाषण केले होते. या भाषणानंतर सोलापुरी जॅकेटची त्यांनी प्रशंसा केली होती.

महेश कुलकर्णी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरातील कापड व्यावसायिक किरण यज्जा यांना काही दिवसांपूर्वी सोलापुरी जॅकेट पाठवले. हे जॅकेट मिळताच मंगळवारी थेट पंतप्रधानांनी यज्जा यांना काॅल करून त्यांचे आभार मानले. तसेच यापुढे आपण अधिक त्रास न घेता सांगितल्यावर जॅकेट पाठविण्याचा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सर्वप्रथम सोलापुरात आले होते. त्यावेळी येथील कापड व्यावसायिक बालाजी आणि किरण यज्जा यांनी त्यांच्यासाठी तीन जॅकेट बनवून दिली होती.

मोदी यांनी यज्जा यांनी शिवलेले जॅकेट परिधान करून सोलापूरच्या सभेत भाषण केले होते. या भाषणानंतर सोलापुरी जॅकेटची त्यांनी प्रशंसा केली होती. त्यानंतर आजपर्यंत यज्जा यांनी पंतप्रधानांना वेळोवेळी ४० जॅकेट पाठवली आहेत. ही सर्वच जॅकेट मोदी यांनी कुठल्या ना कुठल्या समारंभात परिधान केली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी यज्जा यांनी वेगवेगळ्या रंगांची आठ जॅकेट पुन्हा पंतप्रधानांना दिल्ली येथे पाठविली होती. ही जॅकेट मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी थेट किरण यज्जा यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. तसेच सोलापुरी जॅकेटची प्रशंसा केली.

जब मेरा मन करेगा मै कहूंगा...यावेळी मोदी यज्जा यांना फोनवर म्हणाले, ‘अरे भाई तुम इतना सारा सामान मत भेजा करो, मै इसको पहनताभी नही हूँ, तुम बेकार मे खर्चा करते हो... अब मेरा साईज भी बदल गया है... जरूरत पडेगी तो मै आपको जरूर कहुंगा...’ यावर किरण यज्जा यांनी मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मोदी म्हणाले, ‘एकदा जरूर भेटू.’

चद्दर जॅकेटकाही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे पती निक जोन्स यांनी सोलापूरच्या चादरीचा पोषाख परिधान केल्याच्या छायाचित्राची देशभर चर्चा झाली होती. याच प्रकारचे सोलापुरी चद्दर जॅकेट यज्जा यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.

थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर मी आश्चर्यचकीत झालो. सुरुवातीला पंतप्रधानांचे पीएस दीपक जोशी बोलले. त्यांनी पंतप्रधान बोलणार असल्याचे सांगितले. क्षणभर माझा स्वत:वर विश्वास बसला नाही. यानंतर पंतप्रधान स्वत: बोलल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाशी बोलल्याचा मला प्रचंड आनंद झाला.- किरण यज्जा, कापड व्यावसायिक. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी