शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सोलापूरकरांनो; नववर्षाचे स्वागत रस्त्यावर नको, कुटुंबासमवेत करा : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:59 AM

सोलापूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अन् नववर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीय प्रतीक्षा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ...

ठळक मुद्दे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहतीलरात्री फक्त ३५ मिनिटे फटाके फोडा - पोलीस आयुक्त शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरातील ७८ ठिकाणी फिक्स पॉइंट

सोलापूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अन् नववर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीय प्रतीक्षा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान रात्री ११.५५ ते १२.३०  या ३५ मिनिटांच्या कालावधीत फटाके फोडून नवीन वर्षाचे स्वागत करा. रस्त्यांवर  हुल्लडबाजी नको, घरी आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा करा, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी ‘लोकमत’ 'शी बोलताना केले आहे.

शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरातील ७८ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत. यासाठी ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, ५५ सहायक पोलीस निरीक्षक, ९८५ पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस, १ एसआरपी कंपनी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हॉटेल अथवा सार्वजनिक ठिकाणी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकावर बंदी कायम आहे. त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहाटे ५ पर्यंत राहणार हॉटेल सुरू - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहतील, मात्र यासाठी हॉटेलचालकांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करुन फिरणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी १०० ब्रिथ अ‍ॅनालायझर मशीनची व्यवस्था केली आहे. रात्री फिक्स पॉइंट व शहरातील विविध चौकांतील पोलिसांकडे ही मशीन देण्यात येणार आहे. फटाक्यांची ध्वनिमर्यादाही तपासण्यात येईल. यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे गैरवर्तन करणाºयांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरNew Yearनववर्षSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस