शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधणीत सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:32 IST

सोलापूर : शासनाच्या चार योजनेंतर्गत २० हजार ४० घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे, अशी ...

ठळक मुद्देवीस हजारांचा टप्पा पूर्ण; चार योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी २० हजार ४० घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वलपुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने घरकुल बांधणीचा आढावा घेतल्यानंतर त्यात सोलापूरचे काम अव्वल ठरले

सोलापूर : शासनाच्या चार योजनेंतर्गत २० हजार ४० घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी गुरूवारी दिली. 

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील गरिबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजना राबविल्या जात आहेत. या चारही घरकुल योजना सन २०१६-१७ मध्ये सुरू झाल्या. चार वर्षांसाठी २८ हजार ८५३ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील २० हजार ४० घरकुले आजमितीस पूर्ण झाली आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने घरकुल बांधणीचा आढावा घेतल्यानंतर त्यात सोलापूरचे काम अव्वल ठरले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याला तीन वर्षांत १५ हजार ७8५ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. याप्रमाणे आतापर्यंत १३ हजार १५९ घरे पूर्ण झाली असून, उर्वरित घरांचे बांधकाम मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सन २०१६-१७ मध्ये ९ हजार ४५४ घरे मंजूर करण्यात आली, त्यातील ८६१९ घरे पूर्ण झाली आहेत. ३६0 जणांनी घरकुलाचे बांधकाम न केल्याने त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाचे पैसे वसूल करण्यात आले आहेत. सन २०१७-१८ मध्ये ४४८९ घरकुलांना मंजुरी दिली, त्यातील ३४६९ घरकुले पूर्ण झाली आहेत़ उर्वरित घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सन २०१८-१९ मध्ये १८५२ घरकुलांना मंजुरी दिली असून, त्यातील १0७१ घरे पूर्ण झाली आहेत. येत्या महिनाभरात आणखी घरांची कामे पूर्ण झाली आहेत. घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी वाळूचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला. त्यामुळे अडचणी आल्या. आता शासनाने मंजूर घरकुलांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे काम आणखी वेगाने होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजनाHomeघर