सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, फिक्स पॉर्इंट १४,   सीसीटीव्ही कॅमेºयाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवणार येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:38 PM2018-01-11T12:38:40+5:302018-01-11T12:40:06+5:30

शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी  पोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी १४ फिक्स पॉर्इंटचे नियोजन करण्यात आले

Solapur will be going to take control of the crowd by ensuring proper police settlement, fixed-point 14, CCTV cameras for Gramdavev Siddheshwar Yatra. | सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, फिक्स पॉर्इंट १४,   सीसीटीव्ही कॅमेºयाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवणार येणार !

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, फिक्स पॉर्इंट १४,   सीसीटीव्ही कॅमेºयाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवणार येणार !

googlenewsNext
ठळक मुद्देबाहेरील जिल्ह्यातूनही पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.यंदा यात्रेसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहेपोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून त्यासाठी  पोलीस आयुक्तालयातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच यात्रेच्या ठिकाणी १४ फिक्स पॉर्इंटचे नियोजन करण्यात आले असून, बाहेरील जिल्ह्यातूनही पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
 होम मैदानावर ही यात्रा भरते. यात्रेमध्ये चोºया, पाकीटमारी, महिलांची छेडछाड करणारी मंडळी देखील सहभागी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यंदा यात्रेसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ३१ पोलीस निरीक्षक, ८८ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार ४१३ पोलीस कर्मचारी, १२४ महिला पोलीस, पुरुष व महिला ५०० होमगार्ड, एसआरपी कंपनी, याशिवाय पुणे शहर, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सातारा व सांगली या                    जिल्ह्यातील पोलिसांचा बंदोबस्त यात्रेसाठी असणार आहे. डॉ. आंबेडकर चौक ते मार्केट                   पोलीस चौकी, हरिभाई देवकरण ते मार्केट चौकी, प्रशासकीय इमारतीचे गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय  परिसर ते रंगभवन चौक हे मार्ग आपत्कालीन मार्ग ठेवण्यात आले आहेत.
--------------------
नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील वाहतूक वळविण्यात आलेले पॉर्इंट
- बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिर चौक, लक्ष्मण तात्या माने बोळ, थोबडे वाडा बोळ, बाबा कादरी मशीद क्रॉस रोड, चौपाड क्रॉस रोड, राजवाडे चौक, स्टार बेकरी, खाटीक मशीद दत्त चौक, पिंपळ्या मारुती, माणिक चौक, मधला मारुती, समाचार चौक, रंगरेज बोळ, विजापूर वेस (बारा इमाम चौकाकडून येणारा रस्ता), बेगमपेठ पोलीस चौकी क्रॉस रोड, लक्ष्मी मार्केट मारुती मंदिर, पंचकट्टा येलोरा स्टील, ट्रेझरी बँक कार्नर, मार्केट पोलीस चौकी, भगिनी समाज मंदिर, पार्क चौक, बालविकास चौक.बंदोबस्तासाठी निवृत्त पोलिसांचा सहभाग राहणार आहे.
----------------------
प्रवेश बंदची ठिकाणे
- लक्ष्मी मार्केट मारुती मंदिर ,एलोरा स्टील सेंटर,सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर कॉर्नर बेगमपेठ चौकीकडे जाणारा रस्ता, स्टेट बँक ट्रेझरीजवळील रिक्षा स्टॉप लगत, सिद्धेश्वर मंदिर गेट रिक्षा स्टॅन्ड ते रहिमतबी झोपडपट्टी, हरिभाई देवकरण प्रशाला टी पॉर्इंट कॉनर.
------------------
- खाटिक मशीद, काळी मशीद, बाळीवेस, दत्त चौक, शहाजहूर दर्गा, बाबा कादरी मशीद, भारतीय चौक, समाचार चौक, माणिक चौक,  बागवान मशीद, चांदणी चौक, आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, जुना विजापूर नाका असे १४ फिक्स पॉर्इंट नेमण्यात आले आहेत. 
------------------
नंदीध्वज व पालखी मिरवणूक मार्ग
- हिरेहब्बू वाड्यातून  सकाळी आठ वाजता  नंदीध्वज निघतील. त्यानंतर बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, केळकर वकील यांचे घर,दाते यांचे गणपती मंदिर, दत्त चौक, सोन्या मारुती, फौजदार चावडी, माणिक चौक, विजापूर वेस,  मार्कंडेय मंदिर, पंचकट्ट्यावरुन रिपन हॉल मार्गे सिद्धेश्वर मंदिर पर्यंत येतील.

Web Title: Solapur will be going to take control of the crowd by ensuring proper police settlement, fixed-point 14, CCTV cameras for Gramdavev Siddheshwar Yatra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.