भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत उधळला भंडारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 16:22 IST2017-09-18T12:38:03+5:302017-09-18T16:22:42+5:30

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला.

Solapur University Namantar Agitation | भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत उधळला भंडारा

भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत उधळला भंडारा

सोलापूर, दि. 18 - सोलापूर, दि. 18 - सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते, हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात व्यासपीठावर घुसले आणि त्यांनी तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळला आणि नामांतराचे निवेदन पत्रकंही भिरकावली. शिवाय,  यावेळी 'येळकोट येळकोट जय मल्हा' अशी घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे कार्यक्रमादरम्यान एकच गोंधळ उडाला.  दरम्यान, याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

तर दुसरीकडे,  लिंगायत समाजाच्या वतीनेही महात्मा बसवेश्वरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न चिघळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Solapur University Namantar Agitation