सोलापूर - उजनी दुहेरी पाइपलाइनच्या कामास होणार सुरुवात; लक्ष्मी इंजिनीअर्सला मिळाली वर्कऑर्डर

By Appasaheb.patil | Published: October 28, 2022 03:30 PM2022-10-28T15:30:35+5:302022-10-28T15:30:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क

Solapur-Ujni double pipeline work to begin; Lakshmi Engineers got work order | सोलापूर - उजनी दुहेरी पाइपलाइनच्या कामास होणार सुरुवात; लक्ष्मी इंजिनीअर्सला मिळाली वर्कऑर्डर

सोलापूर - उजनी दुहेरी पाइपलाइनच्या कामास होणार सुरुवात; लक्ष्मी इंजिनीअर्सला मिळाली वर्कऑर्डर

Next

सोलापूरसोलापूर उजनी  दुहेरी पाईपलाईनचा विशय आता मार्गी लागला आहे. गेल्या कोरोनामुळे तसेच भूसंपादनामुळे गेल्या दोन वर्शापासून दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आता नव्या मक्तेदाराला हे काम देण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

लक्ष्मी इंजिनिअर्स या कंपनीला हा ठेका मिळाला आहे. गुरुवारी याची वर्कऑर्डर स्मार्ट सिटी कंपनीने त्यांना दिली आहे. लक्ष्मी इंजिनिअर्सने 1.67 टक्के बिलोने टेंडर टाकल्याने त्यांना ठेका मिळाला आहे. त्यातून स्मार्ट सिटीची ४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. २४ महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीने आता पाईप खरेदीस सुरुवातही केली आहे. सोलापूर - पुणे रस्त्याच्या डाव्या बाजूने राश्ट्रीय महामार्गाच्या जागेतून ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग कंपनीने यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न मिटला आहे. ११० एमएलडी पाणी दुहेरी पाईपलाईनमधून येणार होते, परंतु नव्या टेंडरनुसार त्यात दिडपट वाढ झाली आहे. दररोज सुमारे १७० एमएलडी पाणी येणार आहे अशी माहिती त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दरराजे पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर उजनी धरणातील पाण्याची बचतही होणार आहे.

Web Title: Solapur-Ujni double pipeline work to begin; Lakshmi Engineers got work order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.