Solapur: बसने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक ठार
By काशिनाथ वाघमारे | Updated: August 19, 2023 22:36 IST2023-08-19T22:36:16+5:302023-08-19T22:36:28+5:30
Solapur: भरधाव बसने मोटार-सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर परिते (ता.माढा) गावच्या हद्दीत झालेल्या अपघतात करमाळा तालुक्यातील दोघे युवक जागीच मरण पावले.

Solapur: बसने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे युवक ठार
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - भरधाव बसने मोटार-सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर परिते (ता.माढा) गावच्या हद्दीत झालेल्या अपघतात करमाळा तालुक्यातील दोघे युवक जागीच मरण पावले.
निखिल जिगर काळे (वय १८, रा. दहीगाव, ता.करमाळा) व त्याचा साथीदार रोमन चिप्या काळे (वय २२, रा.भाळवणी ता. करमाळा) असे अपघातात मरण पावलेल्या दोघा युवकांची नावे असून शनिवारी पहाटे ५.३० वाजता हा अपघात झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
पोलिस सूत्राकडील माहिती नुसार निखिल काळे व त्याचा साथिदार रोमन काळे हे दोघे शनिवारी पंढरपूरहून टेंभुर्णीकडे येत होते. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास परिते शिवारात एका हॉटेल जवळ आले असता पाठीमागून आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अपघात पथकाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी त्या दोघांना टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषीत केले.