टॉवेल कारखान्याला लागलेली आग पुन्हा भडकली
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 18, 2025 19:58 IST2025-05-18T19:58:32+5:302025-05-18T19:58:47+5:30
Solapur Fire News: अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील टॉवेल कारखान्याला लागलेली आग सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर पुन्हा भडकली. आगीची लोळ उंचच्या उंच दिसू लागल्याने बघ यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

टॉवेल कारखान्याला लागलेली आग पुन्हा भडकली
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील टॉवेल कारखान्याला लागलेली आग सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर पुन्हा भडकली. आगीची लोळ उंचच्या उंच दिसू लागल्याने बघ यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्फोट झाल्यासारखा मोठ मोठा आवाज परिसरात ऐकावयास आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोलापुरात रविवारी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सायंकाळी चारच्या सुमारास आगेवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले होते. मात्र सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या नंतर पुन्हा आग भडकली. सध्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. सध्या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीचा भडका जोरात उडत असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.