Solapur: बार्शीत संशयित तरुणाला पकडले, गावठी पिस्टलसह दोन राउंड जप्त
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 21, 2024 23:22 IST2024-05-21T23:22:06+5:302024-05-21T23:22:21+5:30
Solapur Crime News: बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले. आकाश सुभाष गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Solapur: बार्शीत संशयित तरुणाला पकडले, गावठी पिस्टलसह दोन राउंड जप्त
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले.
आकाश सुभाष गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवार, २१ मेरोजी बार्शी-लातूर रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अंकुश एकनाथ जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल भांगे, पोलिस कॉन्स्टेबल आकुलकर, कॉन्स्टेबल नितनात हे गस्त घालत लातूर रोडवर झाडबुके महाविद्यालयासमोर येताच तेथे आरोपी हा संशयितरीत्या थांबल्याचे दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाताना त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ परवाना नसलेले पिस्टल व खिशात दोन राउंड, मोबाइल मिळाला. ते जप्त करून कागदात सील करण्यात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.