Solapur: आश्वासनानंतरही गतीरोधक बसवले नाही मंगळवेढ्यात अधिका-याचा गांधीगिरीेत सत्कार
By काशिनाथ वाघमारे | Updated: October 18, 2023 17:47 IST2023-10-18T17:47:18+5:302023-10-18T17:47:39+5:30
Solapur News:

Solapur: आश्वासनानंतरही गतीरोधक बसवले नाही मंगळवेढ्यात अधिका-याचा गांधीगिरीेत सत्कार
- काशिनाथ वाघमारे
सोलापूर - मंगळवेढा शहरातील रस्त्यावर गतीरोधक व जड वाहतूक बंदी संदर्भातील बोर्ड चार दिवसात बसवण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनाला पंधरा दिवस उलटले तरी कोणतीही कारवाई झाली नाही. मंगळवेढा नगरपालिकेच्या अधिका-याला शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरीत सत्कार केला.
मंगळवेढा शहरात रस्तावर गतिरोधकाची गरज आहे. गतीरोधक नसल्याने आजपर्यंत अनेकांनी आपले जीव गमावला आहे. काहींना अपंगत्व आले आहे. आश्वासन देऊनही गतिरोधक बसवले नाही. याला कंटाळून मंगळवेढा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत सोनटक्के यांचा शाल, फेटा देऊन गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मारुती वाकडे, सुहास पवार, सतीश दत्तू, नागेश डोंगरे, सिद्धेश्वर डोंगरे, सुरेश पाटील, आदित्य हिंदुस्तानी, अजय अदाटे, चंद्रकांत जाधव, दिग्विजय वाकडे उपस्थित होते.