फौजदाराच्या मुलीवर बलात्कार करणाºया पोलिसाला १० वर्षे सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:16 IST2018-02-01T11:15:08+5:302018-02-01T11:16:38+5:30
कविता नगर पोलीस लाईन येथे फौजदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी सुनावली.

फौजदाराच्या मुलीवर बलात्कार करणाºया पोलिसाला १० वर्षे सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : कविता नगर पोलीस लाईन येथे फौजदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल लखू उर्फ लखन गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी सुनावली.
पीडित मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी लखू गायकवाड याच्याविरुद्ध ३७६ (२), बाललैंगिक कायद्यान्वये कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या सासू आजारी असल्याने त्यांच्याकडे बरेच नातेवाईक आले होते.
२१ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी पाच वाजता फि र्यादीची मुलगी बाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादीची नणंद व फिर्यादी हे अंगणात बसले असता, आरोपीच्या घरातून फिर्यादीची मुलगी रडत रडत घराबाहेर आली. आरोपीने त्यांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीवर त्यावेळी खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्याच दिवशी रात्री एक वाजता सहायक पोलीस निरीक्षक सुतार यांनी दवाखान्यात जाऊन फिर्याद घेतली. त्याप्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-------------------
साक्षी ठरल्या महत्त्वाच्या
४या खटल्यात सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, फिर्यादी, सहायक पोलीस निरीक्षक सुतार, डॉ. गुरुराम व तपास अधिकारी डी. बी. राठोड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून सदरील आरोपीस यापूर्वीही उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा दिलेली आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी गायकवाड याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, सहायक सरकारी वकील माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे अॅड. ईस्माईल शेख यांनी काम पाहिले.