शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

सोलापूर स्मार्ट सिटीकडे आहेत ३२३ कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:28 IST

१६ प्रकल्प सुरू: कंपनीला १ कोटी ६३ लाख निव्वळ नफा

ठळक मुद्दे निधीच्या बाबतीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी श्रीमंतकंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवीकंपनीला यावर्षी निव्वळ १ कोटी ६३ लाखांचा नफा

राजकुमार सारोळेसोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्यामुळे गेल्या दोन वर्षात विकास कामाला एक रुपया निधी न मिळाल्याची नगरसेवकाची ओरड असली तरी निधीच्या बाबतीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी श्रीमंत आहे. कंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवी असून, यातून कंपनीला यावर्षी निव्वळ १ कोटी ६३ लाखांचा नफा झाला आहे. 

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची १0 आॅगस्ट रोजी तेरावी बैठक होत आहे. या बैठकीला दुसºयांदा चेअरमन असीम गुप्ता हजर राहणार आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाच्या नावाने सध्या नागरिकांची ओरड असली तरी प्रगतिपथावर असलेल्या १६ प्रकल्पांची स्थिती अत्यंत चांगली आहे. स्मार्ट सिटीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेला निधी व महापालिकेचा हिस्सा असे ३२३ कोटी कंपनीकडे जमा आहेत. 

कंपनीने या रकमा विविध बँकांत अल्प मुदतीच्या ठेवीमध्ये गुंतविल्या आहेत. त्यामुळे या ठेवीवर कंपनीला चांगल्याप्रकारे व्याज मिळत आहे. या ठेवीतून कंपनीला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ९८ हजार इतके व्याज मिळाले आहे. यात बचत खात्याचे व्याज २ लाख ३३ हजार ४0२ रुपये इतके जमा आहेत. विविध प्रकल्पाच्या टेंडर फीपोटी ५ लाख १0 हजार, माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतून १ लाख ७७४ रुपये जमा झाले आहेत. अशा प्रकारे कंपनीचा यातून कंपनीचा निव्वळ नफा १ कोटी ६३ लाख ६0 हजार ६६८ रुपये इतका झाला आहे. 

अशा आहेत बँकांत ठेवी- कॅनरा बँक: २९ कोटी ९७ लाख, आयडीबीआय: ९८.२४ लाख, विजया बँक: ९८.४८ लाख, युको: ५५.१६ लाख, आंध्रा बँक: ४.८३ लाख, बँक आॅफ इंडिया: २.४८ लाख. केंद्र शासनाकडून आलेला निधी: १९४ कोटी, राज्य शासनाकडून आलेला निधी: ९८ कोटी, महापालिकेचा हिस्सा: २0 कोटी असे ३१२ कोटी रुपये निधी ३१ जुलै अखेर उपलब्ध आहे. प्रकल्पावर पुढीलप्रमाणे खर्च झाला आहे. ओपन जिम: २ लाख ७४ हजार, किआॅस्क: ७ लाख ९२ हजार, ई टॉयलेट: १८ लाख ६१ हजार, स्मार्ट रोड: ३ कोटी ११ लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहने (घंटागाडी): २ कोटी ७५ लाख, इंदिरा गांधी पार्क स्टेडियम: २ लाख ५0 हजार, खिंडरोड अल्टरनेट: ४७ लाख १ हजार, एलईडी लाईट प्रोजेक्ट: ३ हजार ६00 रु. असे ६ कोटी ८0 लाख खर्च झाले आहेत. 

आणखी २0 ठिकाणी टॉयलेट- शहरात १0 ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात आले. हे टॉयलेट व्यवस्थित कार्यान्वित झाल्याने शहरात आता आणखी २0 ठिकाणी ई टॉयलेट बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये शुभराय आर्ट गॅलरी, रेल्वे स्टेशन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सातरस्ता बसथांबा, गर्ल्स होस्टेल, सिरॉक हॉटेलजवळ, रंगभवन, जिल्हा परिषद, पासपोर्ट आॅफिसजवळ, कोंतम चौक, टिळक चौक, गणपती घाट, सावरकर मैदान, भागवत टॉकीजसमोर, डफरीन चौक.

जलवाहिनीसाठी २00 कोटी- एनटीपीसीने सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी २५0 कोटी राखीव ठेवले आहेत. यात स्मार्ट सिटी योजनेतील २00 कोटी जमा करून साडेचारशे कोटीत समांतर जलवाहिनी योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उजनी ते सोलापूर अशी ११0 दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यासाठी ४३९ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

ही योजना राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना आता स्मार्ट सिटी योजनेतून साकारण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी ३७0 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ९६ कोटी स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियातील (जुने गावठाण) पाणी पुरवठा सुधारण्यासाठी खर्च करावयाचे आहेत. उर्वरित २७३ कोटींतून या योजनेसाठी निधी देण्याचा प्रस्ताव आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका