सोलापूर शिवसेना शहरप्रमुखपदी विष्णू कारमपुरी तर युवा सेना शहर प्रमुखपदी विठ्ठल वानकर

By Appasaheb.patil | Updated: September 25, 2022 14:26 IST2022-09-25T14:26:45+5:302022-09-25T14:26:51+5:30

ठाकरे सेनेच्या निवडी - शहर संघटपदी अतुल भंवर तर अक्कलकाेट तालुका प्रमुखपदी बुक्कानुरे

Solapur Shiv Sena City Chief Vishnu Karampuri and Yuva Sena City Chief Vitthal Wankar | सोलापूर शिवसेना शहरप्रमुखपदी विष्णू कारमपुरी तर युवा सेना शहर प्रमुखपदी विठ्ठल वानकर

सोलापूर शिवसेना शहरप्रमुखपदी विष्णू कारमपुरी तर युवा सेना शहर प्रमुखपदी विठ्ठल वानकर

सोलापूर : शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुखपदी विष्णू कामरपुरी यांची तर युवासेना शहर युवा अधिकारीपदी विठ्ठल वानकर यांची नियुक्ती झाली. युवा सेनेचे नवे पदाधिकारी जाहीर झाले आहेत.

शिवसेनेचे शहर प्रमुखपदी गुरुशांत धूत्तरगावकर यांच्याकडे हाेते. २०१९ साली त्यांची नियुक्ती झाली हाेती. काही दिवसांपूर्वी आपण शहर प्रमुख म्हणून काम करण्यास इच्छूक नसल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले हाेते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून रविवारी विष्णू कारमपुरी यांची नियुक्ती जाहीर झाली. शहर संघटकपदी अतुल भंवर, अक्कलकाेट तालुका प्रमुखपदी आनंद बुक्कानुरे, उत्तर साेलापूर तालुका प्रमुखपदी संजय पाैळ यांची नियुक्ती झाली. कारमपुरी गेली अनेक वर्षे शिवसेनेचे कामगार नेते म्हणून काम करीत आहेत. पक्षाच्या पडत्या काळात संघटन वाढविण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे.

दरम्यान, युवा सेनेचा विस्तार झाला आहे. युवा सेनेच्या जिल्हा चिटणीपदी ॲड. मल्लिकार्जुन कारमपुरी. जिल्हा समन्वयक - सुमित साळुंखे. उपजिल्हा युवा अधिकारी - खंडू सलगरकर , रमेश चौगुले, गणेश धाराशिवकर, प्रसाद निळ, अमर बोडा. विधानसभा युवा अधिकारी - राहुल गंधुरे (सोलापूर दक्षिण ), प्रणय इराबत्ती (शहर मध्य ), सुभाष सातपुते (शहर उत्तर).

-------

शहरात नव्या कार्यकर्त्यांना संधी

युवा सेनेत तालुका आणि शहर स्तरावर नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये आकाश साठे (मंद्रूप), समीर परदेशी (करमाळा), गुरुनाथ शिंदे, योगेश भोसले, उमेश जेडगी, विनोद घोडके, अप्पू बिराजदार, अमेय कळसकर, अथर्व चौगुले, संदेश जगताप, अविनाश सिद्धूल, तुषार अवताडे, प्रथमेश तपासे, सौरभ अष्टे, संकेत गोटे यांचा वेगवेगळ्या पदांवर समावेश झाला आहे.

 

 

Web Title: Solapur Shiv Sena City Chief Vishnu Karampuri and Yuva Sena City Chief Vitthal Wankar