सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 09:33 IST2020-09-18T09:33:11+5:302020-09-18T09:33:48+5:30
लोकमत सोलापूर ब्रेकिंग; नव्या पोलीस अधिक्षकांची प्रतीक्षा

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची गुरुवारी अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक या पदावर बदली झाली आहे. मात्र त्यांच्या रिक्त झाले ल्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
शासनाने गुरुवारी पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात मनोज पाटील यांच्या बदलीचा समावेश करण्यात आलेला आहे.
दरम्यान, रिक्त झालेल्या सोलापूर पोलीस अधीक्षक या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही, त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत सोलापूरकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.