Solapur: अल्पवयीन मुलीला वारंवार केला मॅसेज, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: July 4, 2023 14:55 IST2023-07-04T14:54:43+5:302023-07-04T14:55:21+5:30

Crime News: दहावीतील मुलीला वारंवार मॅसेज करत, फोन करून तिला मनाला लज्जा वाटेल असे बोलल्या प्रकरणी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: Repeated texting of minor girl, youth charged under POCSO | Solapur: अल्पवयीन मुलीला वारंवार केला मॅसेज, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Solapur: अल्पवयीन मुलीला वारंवार केला मॅसेज, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

- रुपेश हेळवे
सोलापूर - दहावीतील मुलीला वारंवार मॅसेज करत, फोन करून तिला मनाला लज्जा वाटेल असे बोलल्या प्रकरणी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत १५ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अभिजीत पवार (रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही दहावीचे शिक्षण घेत आले. तिला तिच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यात हॅलो, बोलण्यासाठी तू इन्टरेस्टेड असचील तर आपण बोलू असा मॅसेज होता. अनोळखी नंबर असल्याने पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय याची माहिती पीडितेने आपल्या चुलत भावालाही सांगितली. त्यानंतरही आरोपी अभिजीत याने मॅसेज करत, फोन करून पीडितेला लज्जा वाटेल असे बोलला. ही घटना २ जूलै रोजी घडली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Solapur: Repeated texting of minor girl, youth charged under POCSO