Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे

By Appasaheb.patil | Published: March 11, 2024 07:16 PM2024-03-11T19:16:27+5:302024-03-11T19:16:43+5:30

Solapur News: वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Solapur: Power cut due to arrears? If you want to reconnect, you will have to pay | Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे

Solapur: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला ? पुन्हा जोडणी हवी असेल तर भरावे लागतील पैसे

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल ४४ हजार ९७२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दरम्यान, थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक आणि इतर अकृषक अशा ६ हजार १५४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी. यासाठी वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय ऑनलाइन उपलब्ध आहे.

२ लाख ग्राहकांनी थकविले ३२ कोटींची वीजबिलं
दैनंदिन आयुष्यात वीज ही अत्यंत आवश्यक झालेली आहे. मात्र वीज वापरल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ९१५ ग्राहकांनी ३१ कोटी ९४ लाखांचे वीजबिल थकविले आहे.
 
असे आहे पुर्नजोडणी शुल्क (जीएसटी वगळता)
- सिंगल फेजसाठी २१० रूपये
- थ्री फेजसाठी ४२० रुपये
- उच्चदाब वर्गवारीसाठी ३१५० रुपये शुल्क लागू
भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी
- सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये
- थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये शुल्क

Web Title: Solapur: Power cut due to arrears? If you want to reconnect, you will have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.