शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

solapur politics; उस्मानाबाद लोकसभेसाठी दिलीप सोपल याच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:36 PM

बार्शी : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतशा मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या असून, सोलापूर ...

ठळक मुद्देपूर्वापार बार्शी विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातच समाविष्टउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर आजपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित उमेदवारांचेच वर्चस्व राणाजगजितसिंह यांच्या पत्नीच्या नावाचीही चर्चा

बार्शी : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतशा मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या असून, सोलापूर-लातूर व उस्मानाबाद अशा तीन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना विद्यमान खासदारांना पुन्हा मैदानात पाठवणार असे गायकवाडांच्या तयारीवरुन दिसत आहे़, तर भाजपकडून डॉ़ प्रतापसिंह पाटील व राष्ट्रवादीकडून आ़ दिलीप सोपल यांच्या नावाचा बोलबाला आहे.

पूर्वापार बार्शी विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातच समाविष्ट आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर आजपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित उमेदवारांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र सलग पाचवेळा विजयी झालेल्या अरविंद तुळशीदास कांबळे यांचा पराभव करत बार्शीचे रहिवासी असलेले शिवाजी कांबळे यांनी १९९६ साली ही जागा शिवसेनेकडे खेचली होती. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर शिवाजी कांबळे यांनीच बाजी मारली होती. २००४ साली मात्र बार्शीला उमेदवारी मिळाली नाही.

मतदारसंघाच्या बाहेरील असलेल्या मंगळवेढ्याच्या प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना राष्टÑवादीने तर कळंबचे आमदार कल्पना नरहिरे यांना शिवसेनेने संधी दिली. त्यानंतर नरहिरे खासदार झाल्या. नंतर २००९ व २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बार्शीच्या उमेदवाराला कोणत्याही राष्टÑीय पक्षाने संधी दिली नाही. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार झालेल्या उमरग्याचे माजी आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना बार्शी विधानसभा मतदारसंघातून तब्बल ५४ हजार मतांची लक्षणीय आघाडी मिळाली होती. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेऊन यंदा कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युतीच्या जागावाटपात सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे़ परंतु राज्यातील वातावरण पाहता युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे़ भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे. बार्शी तालुक्यातून गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे इच्छुक आहेत़ मिरगणे यांचे तालुक्यात पक्षबांधणीमध्ये योगदान आहे. 

याबरोबरच सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातून कळंब तालुक्यातील धनेश्वरी बोरगावचे रहिवासी व गेल्या चार वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून फिरत असलेले धनेश्वरी शिक्षण संस्था संस्था समूहाचे प्रमुख डॉ़ प्रतापसिंह पाटील यांनी परवाच लातूर येथे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात आहे़ त्यांचे उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे़ तसेच त्यांना राजकीय पार्श्वभूमी व सर्व पक्षात असलेले नातेसंबंध, बार्शीचे माजी आ़ राजेंद्र राऊत व विधानपरिषद सदस्य आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्याशी असलेली जवळीकता व नवा उच्चशिक्षित चेहरा म्हणून त्यांचे नाव क्रमांक एकवर आहे.

लोकसभा निवडणूक आणि माझ्या उमेदवारीची चर्चा याबाबत मी अनभिज्ञ आहे. माझ्या उमेदवारीची चर्चा ही लोकात व पक्षपातळीवर  आहे. याबाबत मलाही आमच्या पक्षाने अद्याप कसलीही विचारणा या अनुषंगाने केलेली नाही. तसेच मी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक नाही.-दिलीप सोपल, आमदार, बार्शी

राणाजगजितसिंह यांच्या पत्नीच्या नावाचीही चर्चा- याबरोबरच सध्या मतदारसंघात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याची़ यात बार्शीचे आ़ दिलीप सोपल यांच्या नावाला पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांची क्रमांक एकची पसंती असून, सोपल यांनी उमेदवारी घ्यावी, असा त्यांचा आग्रह आहे़ परंतु सोपल हे इच्छुक नसल्याची चर्चा आहे़ मात्र शरद पवारांच्या आग्रहामुळे त्यांच्यात गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, असे दिसत आहे़ सोपल यांच्याशिवाय आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावाचाही बोलबाला आहे़  शिवसेनेकडून विद्यमान खा़ रवींद्र गायकवाड यांच्याबरोबरच उद्योजक शंकरराव बोरकर, माजी आ़ ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरDilip Sopalदिलीप सोपलNCPराष्ट्रवादी काँग्रेसOsmanabadउस्मानाबाद