शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

solapur politics : शहर उत्तर विधानसभेत पालकमंत्र्यांच्या विरोधात सहकारमंत्री गटाची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 15:38 IST

राकेश कदम ।  सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येणाºया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात ...

ठळक मुद्देशहर उत्तर हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. यंदा त्यांच्या विरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहेराष्ट्रवादी काँग्रेसच्या 'दादांनी' शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांना तयारी करण्याचा निरोप दिला

राकेश कदम । सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येणाºया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात यंदा नव्या फळीतील नेत्यांनी मोर्चबांधणी केली आहे. सुरेश पाटील यांच्या आरोपानंतर सहकारमंत्री आणि पालकमंत्री गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील, अशी शक्यता आहे. 

शहर उत्तर हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. परंतु, यंदा त्यांच्या विरोधात मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पालकमंत्री मात्र बिनधास्त आहेत. या ‘सेफ’ मतदारसंघातून ऐनवेळी पूत्र डॉ. किरण देशमुख यांना उमेदवारी देउन स्वत: अक्कलकोट किंवा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा त्यांचे समर्थक करीत असतात.

दुसरीकडे  सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणावरुन जो संघर्ष झाला. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत.  कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना त्यासाठी गळ घातली जात आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काडादी यांच्या निवासस्थानी जाउन चर्चाही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'दादांनी' शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांना तयारी करण्याचा निरोप दिला आहे. त्यामुळे संतोष पवारांचे सोशल इंजिनिअरींग सुरू आहे. त्याच्यासोबत महेश गादेकर, मनोहर सपाटे यांचाही संपर्क सुरू आहे. सलग तीन टर्म नगरसेवक असलेले बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत. 

दलित वस्त्यांमधील अखर्चित निधी, शहरातील समस्या यासह मिळेल त्या मुद्यावरुन ते पालकमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांची भूमिका महत्त्वाची असली तरी मधूनच त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा असते. 

महापौर बंडखोरी करणार ?- मूळ विजयकुमार देशमुख गटाचे पण ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनाच हैराण करणारे भाजपा नेते सुरेश पाटील सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे सिध्द झाले आहे. सुरेश पाटलांनी आता आपला मोर्चा सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाकडे वळविला आहे. विषबाधा प्रकरणी त्यांनी संशयित म्हणून सहकारमंत्री गटाच्या नेत्या, महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, अविनाश महागावकर, अशोक निंबर्गी, नगरसेवक सुनील कामाठी यांची नावे घेतली आहे. या कारणामुळे दुखावलेला सहकारमंत्री गट इरेला पेटला आहे. पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात महापौर शोभा बनशेट्टी बंडखोरी करु शकतात, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणBJPभाजपा