Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:29 IST2018-12-25T12:26:22+5:302018-12-25T12:29:14+5:30
करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात ...

Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर
करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात कोणता ना कोणता राजकीय नेता येथे येऊन जात आहे. सोमवारी दुपारी चक्क काँग्रेसचे बडे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.
केळीच्या बागेची पाहणी करून राजकीय पिकनिकचा अनुभव घेतला. सोलापूर, माढा या दोन लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य व्यूहरचनेबाबत चर्चा केल्यानंतर चुलीवरील भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम हेही संजय शिंदे यांच्या मळ्यावर येऊन गेले आहेत. आता सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुशीलकुमार श्ािंदे हे आपल्या फार्महाऊसवर सोमवारी दुपारी आले होते. ते आले जेवण घेतले. बाकी काही नाही.
-संजय शिंदे,
अध्यक्ष, झेडपी