सोलापूर पोलीस जाणार आठवड्यातून दोनवेळा गुन्हेगारांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:44 PM2019-01-03T14:44:35+5:302019-01-03T14:45:50+5:30

विलास जळकोटकर ।  सोलापूर : वाढणाºया गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठी.. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी ‘गुन्हेगार निगराणी ...

Solapur police will be twice the number of culprits in the house | सोलापूर पोलीस जाणार आठवड्यातून दोनवेळा गुन्हेगारांच्या घरी

सोलापूर पोलीस जाणार आठवड्यातून दोनवेळा गुन्हेगारांच्या घरी

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या वर्षात नवा फंडा राबवण्यावर पोलीस आयुक्तालयानं भर दिला सराईत गुन्हेगाराच्या घरावर पाळत ठेवण्यात येणारआठवड्यातून दोनवेळा त्याच्या घरी पोलिसांनी भेटी दिल्यानंतर त्याच्यावर वचक बसेल

विलास जळकोटकर । 

सोलापूर: वाढणाºया गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठी.. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी ‘गुन्हेगार निगराणी योजना’ सुरू केली आहे. याद्वारे सराईत गुहेगारांवर पाळत ठेवण्यात येत आहे. आठवड्यातून दोनवेळा पोलीस त्याच्या घरी भेटी देणार आहेत. नव्या वर्षात नवा फंडा राबवण्यावर पोलीस आयुक्तालयानं भर दिला आहे. 

पोलीस आयुक्तालयाच्या सातही पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांकडून वारंवार चोºया, घरफोडी, मारामारी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडतात अशी माहिती समोर आली. यावर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या सूचनेनुसार सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी गुन्हेगार निगराणी योजना अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेऊन ती सक्रिय केली आहे. 

या योजनेद्वारे पोलीस रेकॉर्डवर वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे, पोलिसांचा वारंवार होणारा ससेमिरा यामुळे गुन्हेगारावरही दहशत निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला. गुन्हे शाखेच्या वतीने पाच पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथक शहरातील सातही पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची यादी घेऊन त्यांच्या घरावळ पाळत ठेवणार आहेत. चोरी,दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल होताच सराईत गुन्हेगार घरी आहे का याची तपासणी होणार आहे. पुन्हा पुन्हा गुन्ह्यामध्ये आढळणाºया गुन्हेगारांकडून इंटरागेशन फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये त्याचे संपूर्ण नाव, फोटो, त्याचा पूर्व इतिहास असा डाटा जमा करण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगण्यात आले.

गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी प्रयत्न
च्एखादा गुन्हा होऊच नये या दृष्टीने ही संकल्पना नव्या वर्षात आणली गेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरा, श्वान पथक या बाबींचा वापर गुन्हे घडल्यानंतर तपासाच्या दृष्टीने करण्यात येतो; मात्र तो गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी सराईत गुन्हेगाराच्या घरावर पाळत ठेवण्यात येणार आहे.  आठवड्यातून दोनवेळा त्याच्या घरी पोलिसांनी भेटी दिल्यानंतर त्याच्यावर वचक बसेल. अशा कृत्यापासून तो परावृत्त होईल, अशी अपेक्षा आहे. हे सामूहिक काम आहे. पोलीस अन् जनता या दोहोंच्या सक्रिय सहभागातून ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी स्पष्ट केले. 

Web Title: Solapur police will be twice the number of culprits in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.