मोठी बातमी; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदारांसह शिंदे बंधूचा भाजपात प्रवेश
By आप्पासाहेब पाटील | Updated: October 29, 2025 15:18 IST2025-10-29T15:15:58+5:302025-10-29T15:18:16+5:30
Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मोठी बातमी; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदारांसह शिंदे बंधूचा भाजपात प्रवेश
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणं आता नव्याने लिहिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.