शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

सोलापूर महानगरपालिकेच्या सभेत शिक्षण समिती स्थापण्याचा प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:52 AM

सोलापूर : महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विशेष शिक्षण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात ...

ठळक मुद्दे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३० अन्वये याकामी शिक्षण मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विशेष समितीशिक्षण मंडळाच्या कामाबाबत सदस्यांना माहिती मिळत नाही. मनमानी कारभार सुरूपैसे नसताना भूसंपादनाचे विषय कशाला आणता : पाटील

सोलापूर : महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विशेष शिक्षण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यासंदर्भात आयुक्त दीपक तावरे यांनी अभिप्राय द्यावा, अशी सूचना सभागृह नेते संजय कोळी यांनी मांडली. 

आरटीई अ‍ॅक्ट लागू असल्याने शिक्षण मंडळ रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३० अन्वये याकामी शिक्षण मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, असा प्रस्ताव राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मांडला होता. त्याला भाजपाने मंजुरी दिली. आयुक्तांनी अभिप्राय द्यावा, असे सांगितले. काँग्रेसचे यु.एन. बेरिया यांनी हा प्रस्ताव चांगला आहे. शिक्षण मंडळाच्या कामाबाबत सदस्यांना माहिती मिळत नाही. मनमानी कारभार सुरू आहे. नव्या आयुक्तांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. 

पैसे नसताना भूसंपादनाचे विषय कशाला आणता : पाटील- सुरेश पाटील यांनी व्हीलचेअरवरुन सभागृहात हजेरी लावली. आरक्षित जमिनीचा मोबदला मागण्यासाठी महेश थोबडे यांनी महापालिकेला नोटीस दिली होती. आरक्षण रद्द होऊ नये यासाठी थोबडे यांना ७ कोटी २१ लाख ४० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव सभेसमोर होता.हा प्रस्ताव फेरसादर करण्याची सूचना संजय कोळी यांनी मांडली. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, नगरसेवकांना भांडवली निधी नाही. महापालिका आर्थिक संकटात असताना एवढा निधी कुठून देणार. प्रस्ताव पाठविणाºया अधिकाºयांना हे कळायला हवे. यापुढील काळात काळजी घ्या, असे सांगितले. 

उत्तरे देता आली नाहीत महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात १८ लाख ६६ हजार खर्चून एलईडी व विद्युत कामे करण्यात आली आहेत. हा खर्च पूर्वी सीझेडएच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आला. मात्र सीझेडएने खर्चाला परवानगी नाकारल्यानंतर तो मनपा निधीतून खर्ची घालण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभेकडे पाठविला. त्यावर सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अधिकाºयांना उत्तरे देता आली नाहीत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाEducationशिक्षणSchoolशाळा