सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वाढीच्या ई निविदेला मुख्यमंत्र्याचा स्टे, व्यापाºयांना तुर्तास दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 16:26 IST2018-07-12T16:26:19+5:302018-07-12T16:26:37+5:30

Solapur Municipal Corporation's E-payment for hiring of fairs, relief to Chief Minister, business and business | सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वाढीच्या ई निविदेला मुख्यमंत्र्याचा स्टे, व्यापाºयांना तुर्तास दिलासा

सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वाढीच्या ई निविदेला मुख्यमंत्र्याचा स्टे, व्यापाºयांना तुर्तास दिलासा

ठळक मुद्देगाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीतगाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत नाही

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या भाडेकरार मुदत संपलेल्या मेजर गाळ्यांचे ई-निविदा पध्दतीने भाडे ठरविण्याच्या आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नागपूरात झालेल्या बैठकीत स्टे दिला़ त्यामुळे तुर्तास तरी व्यापाºयांना दिलासा मिळाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले़

गाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीत, गाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत नाही, भाडेवाढ कशा पद्धतीने करायचे याचे धोरण ठरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले़ गाळे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, माजी आमदार आडम मास्तर यांच्यासह नगरसेवक व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, नगरसेविका संगीता जाधव, गटनेते आनंद चंदनशिवे, किसन जाधव, नागेश वल्याळ, गणेश पुजारी, संतोष भोसले, संघर्ष  समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, केतन शहा, देवाभाऊ गायकवाड, कुशल देढीया, अशोक आहुजा, विश्वजित मुळीक, श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते़

Web Title: Solapur Municipal Corporation's E-payment for hiring of fairs, relief to Chief Minister, business and business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.