सोलापूर लोकमततर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, सेंटरवर भल्या पहाटे कापला केक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:19 IST2018-10-15T13:15:00+5:302018-10-15T13:19:33+5:30
भल्या पहाटेपासून कामाला लागून वाचकांच्या दारापर्यंत जगाच्या बातम्या पोहचविणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सोमवारीची पहाट उर्जा देणारी ठरली.

सोलापूर लोकमततर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, सेंटरवर भल्या पहाटे कापला केक
सोलापूर : वृत्तपत्र विके्रता ते राष्टÑपती आणि संशोधक असा यशोवर्धक प्रवास असलेल्या अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनाची पहाट सोलापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी नवचेतना देणारी ठरली. ‘हॉकर्स डे’चे औचित्य साधून लोकमतसोलापूर आवृत्तीच्या पुढाकाराने येथील आसरा चौक आणि दत्त चौक या दोन मोठ्या हॉकर्स सेंटरवर सोमवारी भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला; एकमेकांना भरविण्यातही आला.
हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग मेढेगार आणि लोकमतमधील वरिष्ठ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला. हॉकर्स दिनाचे औचित्य साधून ७६ वर्षीय ज्येष्ठ वृत्तपत्रविक्रेते रेवणसिद्ध ढमामे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सर्व हॉकर्स बांधवांच्या वतीने ज्येष्ठ विक्रेत अजीनाथ चव्हाण, अंबादास शिंदे, मोहन कबाडे, यांच्यासह अरविंद नंदर्गी, अशोक देशमुख, अशोक खरात, भीमाशंकर ढमामे, सत्यवान व्यवहारे, रविंद्र गवळी, चेतन वाघमारे, वसीम बागवान, अनिल सोमा, अशोक संत, ज्ञानेश्वर आदींचाही यावेळी पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला.