सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांचा वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:32 IST2017-12-26T12:30:56+5:302017-12-26T12:32:45+5:30

येथील वीरमाहेश्वर जंगम संस्थेतर्फे ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांना वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्कार तर बाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Solapur 'Lokmat' editor Raja Mane, the recipient of the Verma Maheshwar State Level Award |  सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांचा वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

 सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांचा वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

ठळक मुद्देपुण्याच्या शकुंतला आॅडिटोरियम येथे झाला शानदान सोहळा जंगम परिवार डायरी २०१८ चे प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार सोहळाबाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पुणे/ सोलापूर दि २६ : येथील वीरमाहेश्वर जंगम संस्थेतर्फे ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांना वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्कार तर बाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जंगम परिवार डायरी २०१८ चे प्रकाशन व वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार सोहळा गुरुवर्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य वाईकर महाराज, डॉ. जगदीश हिरेमठ, अशोक स्वामी, दिलीप स्वामी, माधव सुलफुले स्वामी, डी. जी. स्वामी, रवी जंगम यांच्या हस्ते शकुंतला आॅडिटोरियम, पुणे येथे झाला.
याप्रसंगी डॉ. जगदीश हिरेमठ यांना (वैद्यकीय), श्रीकांत हिरेमठ, सुभाष लडगे, राजेश चिट्टे यांना (उद्योग), रवींद्र जंगम (शिक्षण), अरुण चंद्रशेखर (पौरोहित्य), डॉ. संतोषकुमार स्वामी, (सामाजिक युवा), अर्चना घाणेगावकर (शासकीय), बाबुराव मठपती (जीवनगौरव), वीरशैव माहेश्वर मंडळ, मुंबई (उत्कृष्ट संस्था) या क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल वीरमाहेश्वर भूषण पुरस्कार विरुपाक्ष अंकलकोटे (सामाजिक), डॉ. जयश्री तोडकर (वैद्यकीय) क्षेत्रातील वीरशैव पुरस्कार देण्यात आला. समारंभासाठी नागपूर, चंद्रपूर सांगली, नांदेड, परभणी, सोलापूर, बार्शी, कोल्हापूर या जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील वीरमाहेश्वर जंगम संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष महेश कुगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार शंकर वसेकर यांनी मानले.

Web Title: Solapur 'Lokmat' editor Raja Mane, the recipient of the Verma Maheshwar State Level Award