Solapur: सोलापुरातून नववीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण
By रवींद्र देशमुख | Updated: January 6, 2024 19:33 IST2024-01-06T19:32:19+5:302024-01-06T19:33:41+5:30
Solapur Crime News: बहिणीला शाळेतून घरी सोडल्यानंतर बाहेर जाऊन येतो म्हणून गेलेला १४ वर्षाचा मुलगा परत आलाच नाही. शोधाशोध करुनही तो मिळून आला नसल्याने त्याचे वडील संदीप बाबुराव साळुखे यांनी आपल्या मुलाचं कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात शनिवारी नोंदवली.

Solapur: सोलापुरातून नववीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण
- रवींद्र देशमुख
सोलापूर - बहिणीला शाळेतून घरी सोडल्यानंतर बाहेर जाऊन येतो म्हणून गेलेला १४ वर्षाचा मुलगा परत आलाच नाही. शोधाशोध करुनही तो मिळून आला नसल्याने त्याचे वडील संदीप बाबुराव साळुखे यांनी आपल्या मुलाचं कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात शनिवारी नोंदवली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शंभू संदीप साळुंखे असे अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.
यातील फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी संदीप बाबुराव साळुंखे (वय- ३७, रा. टिकेकरवाडी, कुमठा रोड, सोलापूर) हे मजुरी करुन पती-पत्नी, एक मुलगी व मुलगा शंभू एकत्र ाराहतात. ५ जानेवारी रोजी शंभू शाळेत असलेल्या बहीण शुभांगीस घरी सोडून बाहेर जावून येतो म्हणून दुपारी १२:३० च्या दरम्यान गेला तो परत आला नाही. फिर्यादी घरी आल्यानंतर त्याचा ही बाब समजताच त्यांनी आजूबाजूला, नातलगांकडे चौकशी करुनही तो मिळून आला नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिकी करीत आहेत.