शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:53 IST

‘हद्दवाढ’मध्ये पूर्णत: विस्कळीत पुरवठा, विभागीय कार्यालयांकडृून टँकरचा पर्याय

ठळक मुद्देबाळे, शेळगी, दहिटणे, मजरेवाडी, नेहरूनगर, कुमठे, सोरेगाव या भागात मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीतऔज बंधारा कोरडा तर चिंचपूर बंधारा शून्यावर आल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर : भर उन्हात सायकलीला घागरी लावून पळणारी मुले..  टँकरच्या प्रतीक्षेत असणारे नागरिक... सार्वजनिक पाणवठे, हापसा, बोअर ठिकाणी गर्दी़.. महापालिकेच्या विभागीय (झोन) कार्यालयात कर्मचाºयांकडून प्रयत्ऩ़़ टँकर येताच गलका.. हद्दवाढ भागात पाचव्या दिवशी सर्वसामान्यांना दाही दिशा धावताना दिसून आले.

एरव्ही शहराला दररोज पाणीपुरवठा होण्याबाबत चर्चा होणाºया महापालिकेकडून ऐन उन्हाळ्यात तीन दिवसाआडचे चार दिवसाआड आणि आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतोय़ घोषणेनुसार पाचव्या दिवशी सकाळचा सायंकाळी पाणीपुरवठा होतोय़ विस्कळीत पाणीपुरवठ्याचा, वेळापत्रकाचा नागरिकांतून नाराजी उमटत आहे़ पंधरा दिवसांपूर्वी हद्दवाढ भागात वसुली मोहीम हाती घेतलेल्या पथकाला या काळात कोणत्याच नगरात फिरता येईना.

दुसरीकडे याच प्रशासनाला मंगळवारी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी धावाधाव करावी लागली़ सध्या आचारसंहिता असल्याने सर्वसामान्यांना नगरसेवकांकडेही जाऊन गाºहाणी मांडता येत नाही, पालिका आयुक्तांना जाऊन भेट घेता येत नाही़ अशा विचित्र परिस्थितीचा सामना करणारे हद्दवाढवासीय दिवसभरात पाणीपुरवठ्याच्या पर्यायाच्या शोधात होते.

अनेक कुटुंबे दुचाकीवर घागरी, हंडा घेऊन पाण्याच्या शोधात पाहायला मिळाले़ स्वागतनगर, नई जिंदगी या परिसरातील मजूर लोक यांची आज सकाळी सार्वजनिक हातपंपावर पाण्यासाठी लांबलचक रांग पाहायला मिळाली. पाणी पातळी खालावल्याने काही ठिकाणचे हातपंप जड जाताना निदर्शनास आले.

आज उशिरा, कमी दाबाने पाणीपुरवठा- औज बंधारा कोरडा तर चिंचपूर बंधारा शून्यावर आल्याने महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाचव्या दिवशीही सोलापूरकरांना पाणी मिळाले नाही. हा निर्णय घेतल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना फटका बसला. चौथ्या दिवशीचे नियोजन असलेल्या नगरात पाणी आले नाही, तर पाचव्या दिवसाच्या नियोजनातील भागालाही पाणी सोडण्यात आले नाही. या व्यत्ययामुळे २७ मार्च रोजी ज्या भागात पाणी सोडण्यात येणार आहे त्या भागालाही आता उशिरा व कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी सांगितले.

हद्दवाढवासीय चावीवाल्याच्या प्रतीक्षेत- हद्दवाढ भागात बाळे, शेळगी, दहिटणे, मजरेवाडी, नेहरूनगर, कुमठे, सोरेगाव या भागात मंगळवारी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या भागाला पूर्वी चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हायचा़ आता तो पाच दिवसाआड झाला़ तसेच ज्या भागाला सकाळी पाणीपुरवठा व्हायचा तेथे आता सायंकाळी होऊ लागला़ काही घरातील लोक पाचव्या दिवशी सकाळी पाणीपुरवठा होईल या समजुतीने भांडी धुऊन रिकामी केली़़़मात्र चावीवाला सायंकाळी येऊन पाणी सोडणार असे समजताच तोंडचे पाणी पळाले़ या लोकांनी खासगी पाणीपुरवठादारांकडून जार मागवून दिवस भागवला़ कुमठे परिसरात नेमके हेच चित्र पाहायला मिळाले़ सायंकाळी ६ वाजता पाणीपुरवठा झाला़ या भागातील नागरिक दिवसभर चावीवाल्याच्या प्रतीक्षेत होते़ 

४० रुपये बॅरलने पाणीपुरवठा- पाचव्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होताच दयानंद महाविद्यालय, कुमठे परिसरात आमराई, गुरुनानक-कुमठा नाका रोडवर गुरुद्वार, देगाव रोड अशा अनेक मार्गांवर खासगी पाणीपुरवठादारांनी ४० रुपये पिंप (बॅरल) पाणीपुरवठा सुरू केला आहे़ सध्या खासगी पाणीपुरवठादारांचा धंदा जोरात सुरू आहे़ काही ठिकाणी वॉटर प्युरिफायर केंद्रावरुन ४० रुपयांना जार पुरवला जात आहे़ पाचव्या दिवशी हद्दवाढ भागात जार पुरवठा करणाºया गाड्या दिसल्या़

बांधकाम थांबले- हद्दवाढ भागात कुमठे, मजरेवाडी, साखर कारखाना परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून अनेक घरकुलांचे काम सुरू आहे़ खासगी पाणीपुरवठा केंद्राकडे आज पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी पाणी मागणी झाली़ त्यामुळे या केंद्रावरून या बांधकामांना पुरवठा होणारे पाणी आज घरोघरी पुरवताना पाहायला मिळाले़ त्यामुळे काही ठिकाणी बांधकामही रखडताना पाहायला मिळाले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईUjine Damउजनी धरणdroughtदुष्काळ