Solapur: करमाळ्यात मराठा आरक्षण प्रश्नी जेलभरो आंदोलन
By रूपेश हेळवे | Updated: October 31, 2023 18:41 IST2023-10-31T18:41:37+5:302023-10-31T18:41:59+5:30
Solapur: मराठा आरक्षण प्रश्नाच्या मागणीसाठी येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आरक्षण मागणीसाठी शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले.

Solapur: करमाळ्यात मराठा आरक्षण प्रश्नी जेलभरो आंदोलन
- रुपेश हेळवे
करमाळा - मराठा आरक्षण प्रश्नाच्या मागणीसाठी येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आरक्षण मागणीसाठी शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले. प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी अटक करून घेतली व दोन पोलिस वाहनाव्दारे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात आणून अटकेची कारवाई पूर्ण केली. तब्बल ४८ आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करून सोडून देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साने यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. करमाळा तहसिल कार्यालयासमोर आरक्षणप्रश्नी गेल्या सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. अनेक संस्था, संघटना व विविध पक्ष पदाधिका-यांनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला.