Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले
By विलास जळकोटकर | Updated: July 18, 2024 19:15 IST2024-07-18T19:14:59+5:302024-07-18T19:15:30+5:30
Solapur Crime News: पती-पत्नीचे भांडण झाल्याने कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीकडे माहेरी जाऊन पतीनं तिच्याशी भांडण करुन गळ्यातले मंगळसूत्र तोडले, चेहऱ्यावर ॲसिड ओतून मारहाण केल्याची घटना हालहळ्ळी (ता. अक्कलकोट येथे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.

Solapur: पतीने माहेरी राहणाऱ्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून चेहऱ्यावर ॲसिड फेकले
- विलास जळकोटकर
सोलापूर - पती-पत्नीचे भांडण झाल्याने कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीकडे माहेरी जाऊन पतीनं तिच्याशी भांडण करुन गळ्यातले मंगळसूत्र तोडले, चेहऱ्यावर ॲसिड ओतून मारहाण केल्याची घटना हालहळ्ळी (ता. अक्कलकोट येथे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. आरती हणमंत म्हमाने (वय २७, रा. रामपूर, ता. अक्कलकोट (असे जखमी महिलेचे नाव आहे.
यातील जखमी महिलेचे सासर रामपूर असून, पती-पत्नीच्या भांडणामुळे ती माहेरी राहत होते. जखमीचा पती गरुवारी हालहळ्ळी येथे पत्नीच्या माहेरी (स्वत:च्या सासरवाडीत) गेला. तेथे दोघांचे भांडण झाले. यात त्याने मारहाण करुन चेहऱ्यावर ॲसिड फेकले. गळ्यातील मंगळसूत्र तोडले. याचा त्रास होऊ लागल्याने भाऊ सचिन यांनी उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीतील एमएलसी रजिस्टरला नोंद झाली आहे.