Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: July 16, 2023 14:47 IST2023-07-16T14:46:37+5:302023-07-16T14:47:18+5:30

Solapur: मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: Girl slapped by checking chat, youth charged with POCSO | Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

- रूपेश हेळवे
सोलापूर - मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोहसिन जाफर नदाफ ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.

काही दिवसापूर्वी पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. पीडिता ही १२ वीचे शिक्षण घेत आहे. ती १५ जुलै रोजी वर्गात असताना आरोपी हा तिच्या वर्गात येऊन तिला वर्गाच्या बाहेर घेऊन गेला. तिला मोबाईल मागितल्यानंतर पीडितेने दिला नाही. यामुळे त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल काढून घेत पासवर्ड काढण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकातील मुलाशी केलेली चॉटींग पाहून त्याने पीडितेला शिवीगाळ करून तिचा मोबाईल फेकून दिला. यामुळे मोबाईल फुटला. याप्रकरणी आरोपी मोहसिन नदाफ याच्यावर लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Solapur: Girl slapped by checking chat, youth charged with POCSO