सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार!

By Appasaheb.patil | Updated: August 10, 2023 19:50 IST2023-08-10T19:49:45+5:302023-08-10T19:50:07+5:30

सोलापूर : प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर - गदग एक्सप्रेस ही होसपेठपर्यंत धावणार आहे. ...

Solapur-Gadag Express will run till Hospeth; Passengers going for tourism will be facilitated! | सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार!

सोलापूर- गदग एक्सप्रेस होसपेठपर्यंत धावणार; पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार!

सोलापूर : प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर- गदग एक्सप्रेस ही होसपेठपर्यंत धावणार आहे. याबाबतचा परिपत्रक रेल्वे प्रशासनाने काढले आहे. या निर्णयामुळे मुंबई, सोलापूर, होसपेठच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

या गाड्यांच्या विस्तारामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमित ट्रेनची सोय होणार आहे. दरम्यान, सोलापूर- होसपेठ नियमित गाडी सोलापूरहून सकाळी ११:५० वाजता सुटणार असून रात्री दहा वाजता होसपेठला पोहोचणार आहे. होसपेठहून रात्री १२:१५ वाजता गाडी सुटणार असून सकाळी ९:३० वाजता सोलापुरात पोहोचणार आहे.

याशिवाय मुंबईहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल- होसपेठ नियमित गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून रात्री ९:२० वाजता सुटणार असून होसपेठला दुसऱ्या दिवशी दुपारी १२:४५ वाजता पोहाेचणार आहे. तर होसपेठ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नियमित गाडी होसपेठहुन दुपारी दाेन वाजता सुटणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला सकाळी ५:१० वाजता पोहोचणार आहे. तरी रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांचा विस्तार व बदललेल्या वेळेची माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Solapur-Gadag Express will run till Hospeth; Passengers going for tourism will be facilitated!