सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 18, 2025 17:29 IST2025-05-18T17:29:08+5:302025-05-18T17:29:28+5:30
Solapur News: अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टावेल कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच घटनेत अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असे तिघेजण भाजले आहेत.

सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टावेल कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच घटनेत अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असे तिघेजण भाजले आहेत.
सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे साडेचार च्या सुमारास आग लागली. यादीत सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती मात्र त्यानंतर काहीजण अडकले असल्याचेही सांगण्यात आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. भडकलेली आग व धूर यामुळे मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. शेवटी भिंत फोडून मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. बारा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमक दलास यश आले.