शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

Solapur: कोर्टात केस असतानाही जागेचा व्यवहार केला! तिघांवर गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Updated: July 22, 2023 14:40 IST

Solapur Crime News: दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- रवींद्र देशमुख  सोलापूर - दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजेश सिद्रामप्पा पाटील (वय ४७, रा. सुदीप कॉम्पलेक्स, होटगी रोड) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे जागेच्या शोधात होते. तेव्हा आरोपी सुभाष रंगनाथ लोहार याची शिवाजी नगर बाळे येथे जागा असल्याची माहिती पाटील यांना कळाली. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये बैठकीच्या वेळी दोघांमध्ये त्या जागेचा व्यवहार १२ कोटी रुपयांमध्ये ठरला. इसारा पोटी फिर्यादी पाटील यांनी एक लाख रूपये रोख व २४ लाख रुपये चेकव्दारे आरोपी लोहार यांना दिले. दरम्यान, त्या जागेबाबत आरोपी सुभाष व त्यांचे बंधू यांच्यात वाद सुरू असून त्या संदर्भात सोलापूर दिवाणी कोर्टात वाद सुरू असल्याचे फिर्यादी यांना कळाले. ही बाब आरोपींनी फिर्यादीपासून लपवली. शिवाय इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत केले नाही. या प्रकरणी राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष लोहार, भुषण सुभाष लोहार, रत्नकुमार सुभाष लोहार ( रा. सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयSolapurसोलापूर