Solapur: दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला अन् तरुणाचे दात पडले
By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2023 18:29 IST2023-06-12T18:29:16+5:302023-06-12T18:29:58+5:30
Solapur News: घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले. रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली.

Solapur: दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला अन् तरुणाचे दात पडले
- विलास जळकोटकर
सोलापूर - घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले. रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली. राकेश हणमंतू बुरला (वय- २७, रा. नवीन घरकूल, कुंभारी, सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. यातील जखमी तरुण दुचाकीवरुन आपल्या घराकडे निघाला होता. पूर्व भागातील लक्ष्मीनारायण टाकी, एमआयडीसी रोडवर तो आला असता कुत्रा आडवा आला. यामुळे त्याचे दुचाकीवरील निंत्रण सुटले आणि रस्त्यावर पडला. यामध्ये त्याचे दोन दात पडले. हातापायाला खरचटले. त्याचा मित्र श्रीकांत आदेली याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटननेची नोंद करण्यात आली आहे.