सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया मंदावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:51 IST2018-06-14T14:51:52+5:302018-06-14T14:51:52+5:30

सोलापूर जिल्हा बॅक : शासनाकडे लटकलेली यादी येईना

Solapur district's debt waiver process has slowed down | सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया मंदावलेलीच

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया मंदावलेलीच

ठळक मुद्देपात्र शेतकºयांचीही यादी येण्यासाठी वेळ३१ हजार ८३१ शेतकºयांची नावे अपात्रदीड लाखांवरील रक्कम १२ हजार ६४५ शेतकºयांनी भरली नाही

सोलापूर: जिल्हा बँकेच्या अर्ज भरलेल्या दोन लाख २० हजार शेतकºयांपैकी अवघ्या ७७ हजार २९६ शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकºयांची यादी शासनाकडेच लटकली आहे. जिल्हा बँकेला ३८६ कोटी ९ लाख १३ हजार ६८२ रुपये मिळाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मागील वर्षी जूनमध्ये शेतकºयांसाठी कर्जमाफी जाहीर केली. यासाठी मागील वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदार शेतकºयांनी दोन लाख २० हजार अर्ज भरले होते. यातील शासन निकष व एकापेक्षा अनेक बँकांचे कर्जदार असल्याचे तपासणीत मोठ्या प्रमाणात अर्ज अपात्र ठरले.

पात्र शेतकºयांचीही यादी येण्यासाठी वेळ लागत असून आतापर्यंत शासनाकडून जिल्हा बँकेला ९ ‘ग्रीन’ याद्या आल्या आहेत. शासनाकडून आलेल्या याद्यांची तपासणी बँकेने केल्यानंतर ३१ हजार ८३१ शेतकºयांची नावे अपात्र झाली आहेत. एकरकमी योजनेस पात्र असलेल्यांपैकी दीड लाखांवरील रक्कम १२ हजार ६४५ शेतकºयांनी भरली नाही. 

कर्जमाफीस पात्र.........

  • -जिल्हा बँकेला आतापर्यंत एक लाख २४ हजार ९४५ शेतकºयांची यादी आली.
  • -तपासणीत ९३ हजार १११ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले.
  • -यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार ४५ हजार ४९७, नियमित कर्ज भरणारे ३० हजार ६१७ व दीड लाखांवरील थकबाकीदार शेतकरी संख्या १६ हजार ९९७ इतकी आहे.
  • - थकबाकीदार, नियमित पैसे भरणारे व दीड लाखांवरील थकबाकीदार अशा ७७ हजार २९६ शेतकºयांच्या खात्यावर ३८६ कोटी ९ लाख १३ हजार ६८२ रुपये जमा झाले आहेत.

Web Title: Solapur district's debt waiver process has slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.