शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी निधी वाटपात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:28 IST

सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी वाटप करण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...

ठळक मुद्दे४२ कोटींची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया टप्प्यासाठी आणखीन ९७ कोटींचा निधी मिळालापंतप्रधान किसान सन्मान निधी वाटपाला गती

सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी वाटप करण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आला आहे. शासनाने दिलेल्या ९७ कोटींपैकी ४२ कोटींचा निधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी जिल्हा प्रशासनाच्या गतीचे कौतुक केले आहे. दुसºया टप्प्यासाठी आणखीन ९७ कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

दुष्काळी मदत निधीचे वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत जैन यांनी गुरुवारी सर्व जिल्हाधिकाºयांचा मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सने आढावा घेतला. या दोन्ही योजनेच्या कामात युद्धपातळीवर गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहेत की नाही, याची खात्री करून तसा अहवालही पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

दुष्काळी मदत निधीचे वाटप करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण ३८८ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील दिलेला ९७ कोटींचा निधी ४० टक्के वितरित करण्यात आला आहे. दुसºया टप्प्यात आणखीन ९७ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आला असून, येत्या आठ दिवसात हा निधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकºयांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्पयात सुमारे पाच लाख शेतकºयांसाठी ९० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. २६ फेब्रुवारीपासून शेतकºयांना या निधीचेही वितरण बँक खात्यात होत आहे.

यासाठी यादी किसान सन्मान पोर्टलवर भरण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत         दोन्ही योजनेतून सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे कामकाज सुरू आहे.

बँकेत मदत पडून न राहण्यासाठी विशेष दक्षताशासनाने दिलेल्या निधीचे वितरण बँकेकडून लाभार्थ्यांना वेळेत होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा देण्यात आलेला मदत निधी बँकेतच पडून राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकेत देण्यात आलेला निधी प्रत्यक्षात किती शेतकºयांना मिळाला, याची माहितीही शासनाने महसूल खात्याकडून मागविली असून, याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी वाटपाला गती- पंतप्रधान सन्मान योजनेसाठी लाभार्थी संख्या निश्चित करून केंद्र शासनाकडे अपेक्षित अनुदानाची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आढावा बैठक घेण्यात येत होती. सुमारे पाच लाख शेतकºयांना पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपयांप्रमाणे मदत मिळण्याची शक्यता आहे. हा निधीही २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून युद्धपातळीवर सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय